आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Support Consideration Two Half Crore Development Works

पाठिंब्याच्या बदल्यात अडीच कोटींची विकासकामे पदरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- "एमआयएम' म्हणजे प्रतिशिवसेना अशी करण्यात आलेली हवा खोटी असल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. पालिका आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कट्टर विरोधक शिवसेना तसेच भाजपला पाठिंबा देताना त्यांनी खेळलेली धूर्त खेळी या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली. पालिकेच्या तिजोरीतून पैसे मिळत नसल्याचे समोर आल्यानंतर हेच पैसे जिल्हा नियोजन मंडळाकडून पदरी पाडून घेण्यात या पक्षाने यश मिळवले.
एमआयएमच्या भूमिकेवर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून जोरदार टीका होत असली तरी आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होणारच होता. परंतु तेथे पाठिंबा देताना आमदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री कदम यांच्याशी वाटाघाटी करून पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात किमान १० लाख रुपयांची कामे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून होतील, याची खबरदारी घेतली. आम्ही विकासाच्या कामांत राजकारण करत नाही, असे सांगण्यास या पक्षाचे नेते नगरसेवक पुन्हा मोकळे झाले. एमआयएम नगरसेवकांच्या वॉर्डातील कामांसाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये देण्याचे पालकमंत्री कदम यांनी मान्य केले.

का राहिले प्रस्तावाच्या बाजूने
आयुक्तमहाजन यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना त्यांच्या दालनातून वेळोवेळी हाकलून दिले होते. त्यामुळे दोन महिने आधीच या नगरसेवकांनी महाजनांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती. परंतु त्याचे राजकारण झाले आणि हा मुद्दा मागे पडला. दुसरीकडे फक्त आयुक्त नव्हे तर शहर अभियंत्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई व्हावी, अशी मागणी या पक्षाने रेटून धरली होती. मात्र प्रस्ताव फक्त आयुक्तांच्याच विरोधात आला. तेव्हा अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले अन् हा पक्ष विरोध विसरून प्रस्तावाच्या बाजूने उभा राहिला.