आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- आरोग्याच्या मूलभूत समस्यांमुळे दु:खी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुप्रेम फाउंडेशनने मदतीचा हात दिला असल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या निश्चित कमी होतील, असा विश्वास अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी व्यक्त केला. सुप्रेम मेडिकल अँण्ड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार सवलत पासेसचे वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी उद्योजक कटारिया बोलत होते. या वेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे मानस सचिव मेजर पी. एन. भगत, रोटरी क्लबचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा उपस्थित होते. कटारिया पुढे म्हणाले की, सुप्रेम फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी आहे.
अशोका ग्रुप नाशकात उभारणार असलेल्या रुग्णालयाच्या माध्यमातून ज्येष्ठांची सेवा करणार आहे. फाउंडेशनच्या कार्याला अशोका ग्रुप पाठीशी असेल. मेजर पी. एम. भगत यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करतानाच समाजोपयोगी संस्था कार्यरत असणे काळाची गरज असल्याचे सांगितले. फाउंडेशनने 11 गरीब मुले दत्तक घेतले असून, त्यांचा शैक्षणिक भार उचलत आहे. मनपाच्या जेतवननगर शाळेत दरवर्षी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे डॉ. प्रशांत भुतडा यांनी प्रास्ताविकात सांगितले. यानंतर डॉ. देवदत्त चाफेकर, डॉ. राज नगरकर, डॉ. विलास गुजराथी या मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जयंत भाभे यांनी केले. कार्यक्रमास विनय भंडारी, शंकर औशीकर, वामन भागवत, भाऊराव जाधव, विष्णू दुगावकर, राजेंद्र जोशी, डॉ. कैलास मोगल, जगन्नाथ पाटील, डॉ. विजय सुराणा, डॉ. कविता भालेराव, डॉ. सारंग दराडे, डॉ. विभा वराडे, डॉ. मयूर गांगुर्डे, रमेश जाधव आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.