औरंगाबाद - तामिळनाडूमध्ये मकरसंक्रातींच्या पर्वावर पोंगल हा सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येथील 'पोंगल' चार दिवस साजरा होतो. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच उत्सवात जलिकट्टू हा धावत्या बैलाला रोखण्याचा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र आज, सर्वाच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीसह जलिकट्टू या खेळावरील बंदी कायम ठेवली आहे. जाणून घेऊया या अनोख्या शर्यत आणि जलिकट्टूमधील फरक...
शंकरपट...
- महाराष्ट्रात शंकरपटाचे आयोजन करून विशेष रस्त्यावर बैलगाडीची शर्यत घेतली जाते.
- सर्वात कमी वेळात ठराविक अंतर पार करणारी बैलजोडी या शर्यतीत विजयी ठरते.
- वेगवान धावणा-या बैलांना आयोजकांच्या वतीने बक्षीस दिले जाते.
- बैलाच्या मालकालाही रोख रक्कम नि कपडे बक्षिसाच्या स्वरूपात दिले जातात.
- पंचक्रोषीतील तगड्या बैलजोड्या शंकरपटात शर्यत जिंकण्यासाठी सहभागी होतात.
जलिकट्टू...
- हा तामिळनाडूमधील खेळ प्रसिद्ध खेळ असून संक्रातच्या पर्वावर 'पोंगल' सणाला हा खेळ खेळला जातो.
- या खेळात धावत्या बैलाला ठरवून दिलेल्या क्षेत्रात रोखावे लागते.
- जलिकट्टू खेळ जीवघेणाही ठरू शकतो. मात्र धार्मिक परंपरेच्या माध्यमातून त्याकडे पाहिले जाते.
- चार दिवसांच्या पोंगल उत्सवात हा खेळ खेळला जातो.
- संक्रांतीच्या पर्वावर येणा-या पोंगल सणाला तामिळनाडूमध्ये बैलांची पूजा केली जाते.
- या खेळाला तामीळ लोक कृषीप्रधान देशाची संस्कृती मानतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जलिकट्टू खेळाचा असा असतो थरार...