आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supriya Sule Attack On CM Fadanvis At Aurangabad Drought Visit

दुष्काळग्रस्तांना न्याय न दिल्यास लाटणे मोर्चा काढणार : खासदार सुप्रिया सुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त महिलांशी चर्चा करताना सु्प्रिया सुळे. - Divya Marathi
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त महिलांशी चर्चा करताना सु्प्रिया सुळे.
गेवराई ( जि. बीड) - दुष्काळामुळे मराठवाड्यात परिस्थिती गंभीर झाली असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकार यावर गंभीर नाही. सरकारने दुष्काळग्रस्तांंना न्याय मिळवून न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी गेवराई येथे दुष्काळी दौऱ्यात गुरुवारी दिला.

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी अमृता नदीवर बांधण्यात आलेल्या माती बंधारा आणि नदीचे पुनरुज्जीवन कामाची पाहणी केली. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खरात यांच्या दूध डेअरीमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी आणि महिलांशी संवाद साधला. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, फौजिया खान, अशोक डक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, निरंजन डावखरे, चित्राताई वाघ आदी उपस्थित होते. दुष्काळामुळे वीज बिल माफ करावे, या भागातील कमांड एरिया काढण्यात यावा, शैक्षणिक शुल्क माफ करावे, असे प्रश्न शेतकरी व महिलांनी मांडले.

या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठवाड्यातील दुष्काळाबाबत पवार साहेबांनी सरकारकडे पाच वेळा जाऊन उपाययोजना करण्यात यावी म्हणून भेटी घेतल्या. शेतकऱ्यांना बँकेने कर्ज पुन्हा दिले पाहिजे, शिक्षणासाठी मुला-मुलींना सोयी उपलब्ध द्याव्यात, अशा मागण्या राष्ट्रवादीने केलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच सरकारचे मंत्री गावांत दुष्काळाची पाहणी करून गेले. मात्र, त्याचे नंतर काय झाले माहिती नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारपासून मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधन्य असल्याचे ठासून सांगितले. साखर कारखाने बंद करण्याच्या निर्णयाचा त्यांनी समाचार घेतला, सुळे म्हणाल्या, 'आता दुष्काळ आहे म्हणून तसे बोलले जात आहे. पण जेव्हा दुष्काळ नसेल तेव्हा असे कोणी म्हणेल का?'
मराठवाड्यातील दुष्काळप्रश्नी संसदेत आवाज उठवणार
बीड -
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी असून आम्ही सत्तेत असताना शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा नोंदवा अशा प्रकाराची मागणी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गप्प का आहेत, असा सवाल करत मराठवाड्यातील दुष्काळप्रश्नी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड येथे पत्रपरिषदेत सांगितले.
- मद्य कारखान्यांना पाणी देण्याच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, कुठेलेही सरकार असले तरी पाण्यावर पहिला हक्क पिण्यासाठी, त्यानंतर शेतकऱ्यांना आणि मग कारखान्यांना दिले पाहिजे.
- दारु कंपन्यांना पाणी द्यावे की नाही यावर चर्चाच होऊ शकत नाही, असेही सुळेंनी स्पष्ट केले.
- शेतकऱ्यांनी यापुढे शेतीसाठी ठिबकचा वापर करावा, असे आवाहन करताना सुळे यांनी सरकारने त्यासाठी अनुदान वाढवण्याची मागणी केली.
- मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. आता सरकारची जबाबदारी आहे, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला गेला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी करताना आमच्या सरकारने सातबारा कोरा केला होता, असेही सुळेंनी सांगितले.
- दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रीची मदत घेतली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा समाचार
एवढे दिवस विरोधात राहिल्यामुळे अजून सत्ता त्यांच्या अंगवळणी पडलेली नाही, असा टोला सुप्रियाताईंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढे ओरडून-ओरडून बोलताना मी कधी पाहिले नव्हते असे सांगत सुळे म्हणाल्या, 'फडणवीस सध्या फार उच्च स्वरात ओरडून ओरडून बोलताना दिसत आहेत. कदाचित त्यांना आपण सत्तेत आहोत हे अजून कळालेले नाही.' मुख्यमंत्र्यांनी संयमी बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवेसनेला चिमटा
- राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे आणि सरकार काहीच करत नाही अशी स्थिती असताना बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर आतापर्यंत शिवसेना सत्तेतून बाहेर पडली असती, असा टोला खासदार सुळेंनी शिवसेनेला लागावला.
पुढील स्लाइडमध्ये, चित्ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची केली पाहाणी