आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकटची खैरात मागू नका, त्याची किंमत नसते - सुप्रिया सुळेंचा विद्यार्थ्यांना सल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, देशाचे कृषीमंत्री शरद पवार मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे अधिक लक्ष्य देण्याचा आग्रह धरत आहेत. तर, दुसरीकडे त्यांच्या कन्या खासदर सुप्रिया सुळे या दुष्काळग्रस्तांनी स्वाभिमानाने राहावे, मोफत मिळालेल्याची किंमत नसेत, असे उपदेशाचे डोस पाजत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या उदघाटनासाठी आलेल्या खासदार सुळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीवर, फुकट दिलेल्या वस्तूची किंमत नसल्याचे म्हटेल आहे. त्यासोबतच त्यांनी फुकट काही मागण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वाभिमान शिकावा, असा सल्ला दिला आहे.

झाले असे की, विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या उदघाटन सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे भाषण करत असताना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार विचार करेल, असे सांगितले. त्याचवेळी विद्यापीठातील अधिसभा सदस्य डॉ. पंडित तुपे यांनी दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे फक्त परीक्षा शुल्कच माफ काय करता, संपूर्ण शैक्षणिक शुल्कच माफ करा, अशी मागणी केली. मंत्री महोदयांच्या भाषणात झालेल्या व्यत्ययामुळे ते चिडले आणि त्यांनी तुपेंना खाली बसण्यास सांगून, मला काय करायचे हे तुम्ही सांगू नका, असे सुनावले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यर्त्यांनी डॉ. तुपेंना खाली बसविले.

त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या खासदार सुळे यांनी दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची बाजू मांडण्याऐवजी आपल्या पक्षाच्या नेत्याची बाजू घेतली. टोपे यांची पाठराखण करीत विद्यार्थ्यांनाच उपदेश देण्यास सुरुवात केली. त्या म्हणाल्या, सरकारकडे खैरात मागण्यापेक्षा स्वाभिमान देईल असे शिक्षण मागा. फुकट मिळालेल्या वस्तूंची माणसाला किंमत नसते. त्यासाठी त्यांनी बिस्कीटाचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या फुकट मिळालेल्या बिस्किटांची काही किंमत नसते. मात्र, तेच बिस्किट जर स्वतः पैसे खर्च करुन विकत घेतले तर कोणी फेकून देत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असे काही होऊ देणार नाही. पण, विद्यार्थ्यांनी दुष्काळ आणि शिक्षणाचे राजकारण करु नये, असा सल्ला देण्यासही त्या विसरल्या नाही.

वाचा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपेंच्या मतदारसंघातील मुलगी म्हणाली, आमदार साहेब, चार महिन्यांपासून मी एकवेळ जेवत आहे.