आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supriya Sule News In Marathi, Nationalist Congress, Ajit Pawar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सुप्रियाताईंचे मौन, राज्यात परत न येण्‍याचा केला पुनरूच्चार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपने चेहरा दिला म्हणून देशात त्यांचा विजय झाला. तसाच चेहरा राष्‍ट्रवादी काँग्रेस देणार का, अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणजून जाहीर केले जाईल का, या प्रश्नावर सुप्रिया यांनी मौन बाळगले. आमच्याकडे चेहरा नाही, गुड गव्हर्नन्स हाच आमचा अजेंडा असल्याचे सांगून अजित पवार यांच्या विषयाला बगल दिली. मुख्यमंत्री बदल आणि राष्‍ट्रवादीला जास्तीच्या जागा, या विषयावर बोलण्यासही त्यांनी नकार दिला. सोशल मीडिया कार्यशाळेसाठी त्या शहरात आल्या होत्या. राष्‍ट्रवादी भवनातील कार्यशाळा संपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

विरोधी बाकावर मी एन्जॉय करते
केंद्रातील सत्ता गेल्याने मला काय फरक पडणार? माझ्या वडिलांचे निम्मे आयुष्य विरोधी बाकावरच गेले. गेल्या पाच वर्षांत खूप मित्र झाले होते. या वेळी आणखी नव्या मित्रांची भर पडतेय. मी विरोधी बाकावर मस्त एन्जॉय करतेय, माझ्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी लोकसभा पराभवावर बिनधास्त उत्तर दिले. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही राज्यात यायचे नाही. आपली दिल्लीच बरी, असे त्यांनी पुन्हा-पुन्हा सांगत महाराष्‍ट्रातील राजकारणात आपल्याला रस नसल्याचे ठासून सांगितले.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने रेल्वेच्या भाड्यात वाढ केली. संसदेत अंदाजपत्रक सादर करताना ही वाढ त्यांनी सुचवायला हवी होती. अधिवेशनापूर्र्वी कशासाठी हा अट्टहास करण्यात आला, संसदेला काही महत्त्व नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमाला राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी मोठी उपस्थिती लावली होती.

राष्‍ट्रवादीचे नेते मग्रुरीने वागतात हे खरे
राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते मग्रुरीने वागतात. याबाबत अनेक वेळा तक्रारी आल्या. त्यात काहीसे तथ्यही आढळले. ही बाब साहेबांच्या कानी गेल्यानंतर मुंबईतील मेळाव्यात त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत. या वेळी आम्ही सर्वजण चुका सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले. युतीचे नेते मतदारांशी संवाद साधत असताना राष्‍ट्रवादीचे नेते मात्र मग्रुरीने वागतात, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला असता त्यांनी यास दुजोरा दिला. यापुढे कोणी मग्रुरीने वागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

समविचारी पक्षांनी एकत्र असावे
लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस आघाडीने राज्यातील काही पक्षांना बरोबर घेण्याचे ठरवले आहे. त्यात समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर काय समस्या आहे, असा सवाल उपस्थित करून मतविभाजन टाळण्यासाठी हे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.