आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगली कामे फेसबुकवर टाका; खासदार सुप्रिया सुळे यांचा तरुणांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग आपण केलेल्या चांगल्या कामाच्या प्रचारासाठी करा. चांगली कामे करा आणि नंतर प्रचारासाठी या माध्यमांचा उपयोग करा. प्रत्येकाजवळ असलेले हे माध्यम प्रभावी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करा. आपल्या सरकार आणि मंत्र्यांनी जी सकारात्मक कामे केली आहेत, त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर टाका. हे माध्यम वृत्तपत्रासारखे वापरा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. हडको येथील राष्ट्रवादी भवनात शनिवारी सकाळी 11 वाजता सोशल नेटवर्किंग साइटचा वापर कसा करावा, या विषयावर राष्टÑवादी विद्यार्थी ने कार्यशाळेचे आयोजन केले होते.
सोशल नेटवर्किंग माध्यमे कशा प्रकारे वापरावीत, समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट कशा प्रकारे डिलिट करावी, याचे मार्गदर्शन या वेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील आयटीतज्ज्ञ नितीन वैद्य आणि संजीव लाटकर आले होते. त्यांनी हे माध्यम तांत्रिकदृष्ट्या कशा प्रकारे हाताळावे याचे मार्गदर्शन केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुलींनीदेखील पुढे येऊन
सुरक्षितपणे या तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. सरकारने राबवलेल्या विविध योजना, पक्षाकडून घेण्यात येणारे उपक्रम या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावेत. राज्यभरात या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. या अगोदर पुणे येथेही कार्यशाळा घेण्यात आली. नाशिक, कोल्हापूरला या महिन्यात होणार आहे. या वेळी तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत, शहर अध्यक्ष मुश्ताक अहमद, कदीर मौलाना, सुरजितसिंग खुंगर, सीमा थोरात, राष्टÑवादी विद्यार्थी चे उपाध्यक्ष उमर फारुकी यांची उपस्थिती होती. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश टोपे यांनी आभार मानले.