आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रिया सुळे, तंत्रशिक्षणमंत्री टोपे यांनीही घेतली शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टमुळे गेल्या काही दिवसांत समाजातील वातावरण बिघडले होते. थोर महापुरुषांवरील मजकुरामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘दिव्य मराठी’ने अभियान हाती घेतले. सोशल नेटवर्किंग हे माणसे जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नव्हे, याची जाणीव करून दिली.
या अभियानात शनिवारी राष्‍ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन सोशल नेटवर्किंग साइट्सचा समाज जोडण्यासाठी वापर करण्याची शपथ घेतली.प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. हडको येथील राष्‍ट्रवादी भवनात शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजकारणात सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कार्यकर्त्यांकडूनही माध्यमांचा योग्य वापर व्हायला हवा. यासाठी ‘दिव्य मराठी’कडून विविध राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला राष्‍ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रतिसाद दिला. सोशल नेटवर्किंग साइटचा गैरवापर होऊ देणार नाही, अशी शपथ कार्यकर्ते व पदाधिका-यांनी घेतली.
फेसबुक आणि इतर सोशल नेवटवर्किंग साइट्सचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण राष्‍ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सुमारे 500 कार्यकर्त्यांनी ही शपथ घेतली. समाजात स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे असल्याची भावना या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सोशल नेटवर्किंग साइट्सचा योग्य वापर कसा करता येतील याबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, कदीर मौलाना, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांची उपस्थिती होती.