आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांत आठशे चिमुकल्यांच्या ओठांवर हास्य!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुभंगलेले ओठ आणि फाटलेल्या टाळूसह जन्माला येणाऱ्या बाळांचे प्रमाण भारतात ग्रामीण भागात अधिक आहे. अमेरिकी संस्थांनी पुढाकार घेत शस्त्रक्रिया मोफत करून अशा बाळांच्या ओठांवरचे हास्य परत आणले आहे. एकट्या औरंगाबाद शहरात बेंबडे प्लास्टिक सर्जरी रुग्णालयात आठ वर्षांत आठशे मुलांच्या ओठांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
भारतात जन्माला येणाऱ्या सातशे मुलांमागे एका मुलाला जन्मत: फाटलेली टाळू दुभंगलेले ओठ अशी समस्या आहे. जागतिक स्तरावर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली अाहे. भारतातील हे प्रमाण कमी करण्यासाठी दोन अमेरिकी संस्थांनी मोफत शस्त्रक्रिया करून मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे अविरत कार्य सुरू केले आहे. स्माइल स्ट्रेन, टीडब्ल्यूटीसह काही भारतीय प्लास्टिक सर्जनच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे. डॉ. रमाकांत बेंबडे राज्यभरातील खेड्यांत फिरून फाटलेली टाळू दुभंगलेल्या ओठांच्या बालकांवर शस्त्रक्रिया करतात.

एका शस्त्रक्रियेसाठी किमान सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो. खेडेगावातील पालक या समस्येकडे दोन कारणांनी दुर्लक्ष करतात. पहिले कारण अज्ञान, तर दुसरे पैसा नसल्याने आबालवृद्ध दुभंगलेले ओठ फाटलेल्या टाळूचा त्रास आयुष्यभर सहन करताना दिसतात.

ऐंशी हजारांची शस्त्रक्रिया मोफत
या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो; पण अमेरिकी संस्थांनी शस्त्रक्रियांचा खर्च उचलल्याने ही शस्त्रक्रिया मोफत करणे शक्य झाले आहे. गेल्या आठ वर्षांत आम्ही आठशे बालकांना त्यांचे हास्य परत देऊ शकलो. अज्ञान माहितीच्या अभावाने ग्रामीण भातील लोक शस्त्रक्रियेसाठी येत नाहीत. -डॉ.रमाकांत बेंबडे, संचालक,बेंबडे प्लास्टिक सर्जरी रुग्णालय

ग्रामीण भागात अंधश्रद्धा
दुभंगलेले ओठ फाटलेल्या ओठाचे बालक जन्मले तर मागच्या जन्माची शिक्षा किंवा पाप केल्याने असे होते ही अंधश्रद्धा आहे. पण प्रत्यक्षात गरोदर मातेला संतुलित आहार नसेल, व्हिटॅमिन, मिनरलची कमतरता या प्रमुख कारणांमुळे अशी बालके जन्माला येतात. शहरात हे प्रमाण त्या तुलनेत खूप कमी आहे. गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागात अमेरिकी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया करून बालकांना व्याधीमुक्त करण्यात आले.