आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजारी आई घरात असताना मुलाने घेतला गळफास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काही कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर शेवटी बेरोजगारी नशिबी आली. त्यातच आजारी (मतिमंद) आईची सुर्शूषा करावी लागत असल्याने पुरती दमछाक होऊन नैराश्य आल्याने व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या चोवीसवर्षीय तरुण अभियंत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा त्याची आई घरातच होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठवला. मात्र, आपला मुलगा किचनमध्ये झोपला आहे, एवढेच ती लोकांना सांगत होती. पण तो कायम निद्रिस्त झाला, हे त्या माउलीला ठाऊकच नव्हते.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बीड बायपासवरील दिशानगरी येथे रविवारी उघडकीस आली. महेश सुभाषराव जोशी (24) हा आईसह बीड बायपासवरील दिशा नगरी येथे राहत होता. रविवारी महेशच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांनी याबाबत सातारा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे पोलिसांचे पथक महेशच्या घरासमोर सकाळी साडेनऊच्या सुमारास हजर झाले. आतून कडी लावलेली असल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. किचनमध्ये महेशचा मृतदेह लोखंडी हुकला लटकलेला दिसला. पोलिसांनी मृतदेह खाली काढून घाटी रुग्णालयात दाखल केला. मृतदेहाच्या स्थितीवरून महेशने दोन-तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास जमादार एन. के. बुट्टे करत आहेत.