आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या घरातच विष घेऊन प्रियकराने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोघांनी एकाच महाविद्यालयात शिक्षण (डीएड) पदविका घेतली. पुढे जाधववाडीतील संस्कार शाळेत त्याला शिक्षकाची, तर तिला शिक्षिकेची नोकरी लागली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी मंदिरात लग्नही केले. दोघेही भिन्न जातीचे असल्याने कुटुंबीयांच्या विरोधामुळे अलीकडे तरुणी त्याला टाळू लागली. मंगळवारी त्याच्या घरी जाण्यास तिने नकार देताच संतप्त प्रियकराने प्रेयसीच्या घरीच विष घेतले.
काही तासांच्या उपचारानंतर बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या संतप्त नातेवाइकांनी सिडको पोलिस ठाण्यासमोर घेराव केला. बुधवारी सायंकाळी संबंधित युवती व तिच्या आई-वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

प्रमोद मनोहर जाधव (24, रा. दीक्षाभूमीनगर, हर्सूल) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रमोदच्या खुनाच्या गुन्ह्यात युवतीचे वडील भाऊराव रामराव गुलाल यास आज (3 जुलै) अटक करण्यात आली. गुलाल हे कारागृह पोलिस असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, युवती व तिची आई फरार झाल्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिवाकर पाटील यांनी सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे.
खून केल्याचा आरोप : प्रमोद नवजीवन कॉलनीतील प्रेयसीच्या घरी मंगळवारी गेला. मात्र तिने सोबत येण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या घरात विष घेतले. मुलीच्या वडिलांनी त्याला जाधववाडी कॉर्नरवर असलेल्या एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यांनी त्याच्या नातेवाइकांना प्रमोदने विष घेतल्याची माहिती दिली. बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. प्रमोदने विष घेतले नसून मुलीच्या वडिलांनीच त्याचा खून केला, असा नातेवाइकांचा आरोप होता. नातेवाइकांनी सिडको ठाण्यात गर्दी केली. गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा हट्ट धरला होता.

लग्न केल्याचा दावा
या शिक्षक दांपत्याने हर्सूल परिसरातील एका बुद्ध मंदिरात लग्न केल्याचा दावा मुलाच्या नातेवाइकांनी केला आहे. मात्र असा काही प्रकार घडला नव्हता आणि लग्न केले असेल तर आम्हाला माहिती नव्हते. तो मुलीचा मित्र होता, एवढीच माहिती असल्याचे पोलिसांच्या मुलीच्या वडिलांनी सांगितले.

आंतरजातीय विवाहामुळे विरोध
प्रमोद आणि ती तरुणी वेगळ्या जातीचे होते. तिने लग्न केल्याचे सांगितल्यानंतर वडील संतप्त झाले होते. त्यांनी यास विरोध केला होता. मंदिरात केलेल्या लग्नाचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसल्यामुळे हे प्रकरण येथेच थांबवावे असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच त्यांनी विरोध केला. 1 जुलैच्या सायंकाळी नेमके काय घडले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सातव्या मजल्यावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या
बीएडची पदवी घेतल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या 23 वर्षीय युवकाने बुधवारी सकाळी 10.30 वाजता किलेअर्क येथील समाजकल्याण विभागाच्या मिलिंद वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. गणेश रामू करंगळे (23, निराला बाजार, मूळ गाव विटा, ता. कन्नड) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आत्महत्या करण्यासारखे मोठे कारणही आठवडाभरात समोर आलेले नाही, असे त्याचा भाऊ व मित्र सांगतात. त्याच्या खिशात फक्त एक चिठ्ठी आढळली. ती पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान, माझा मुलगा पाय घसरून पडल्याचे गणेशच्या वडिलांचे म्हणणे आहे.

गणेशचा चुलतभाऊ योगेश हा एमआयटी महाविद्यालयात एमटेकच्या दुस-या वर्षात शिकतो. तो आदिवासी विकास खात्याकडून चालवल्या जाणा-या मिलिंद वसतिगृहात राहतो. त्याला भेटण्यासाठी गणेश नेहमी येत असे. बुधवारी योगेश सकाळीच परीक्षेसाठी वसतिगहातून बाहेर पडला होता. त्यानंतर गणेश तेथे आला. भावाला भेटण्याचे कारण पुढे करून वसतिगृहात प्रवेश केला. सुरक्षा रक्षकांनी त्यास प्रवेश नाकारला होता. पण भावाला पेपरला जायचे आहे, मी लवकर भेटलो नाही तर त्याला उशीर होईल असे सांगितल्यानंतर सकाळी दहा वाजता त्याला प्रवेश देण्यात आला. अर्धा तास झाला तरी तो बाहेर न आल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याचा शोध घेतला असता इमारतीच्या मागील बाजूला रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला आढळून आला.
सुरक्षा रक्षकाने ही माहिती वसतिगृहाच्या वरिष्ठांना कळवली. त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घाटीत योगेशचे मित्र आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रत्येक जण मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी धडपडत होता. गणेशच्या खिशात फक्त मतदानाचे ओळखपत्र आढळून आले. गणेश भेटण्यासाठी येत असल्याचे योगेशला माहिती नव्हते. त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक र्शीपाद परोपकारी यांनी सांगितले.