आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधाच्या संशयावरून खूनप्रकरणी एकास जन्मठेप, चाकूने भोसकले होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी वैजापूर न्यायालयाने निमगाव येथील दिगंबर भिवसन त्रिभुवन (३२) याला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साध्या कैदेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  

तालुक्यातील निमगाव शिवारात गट क्रमांक १५१ मध्ये भारत नवनाथ त्रिभुवन हा कुटुंबासह राहत होता. त्याच्या वस्तीजवळच कोरडगाव शिवारात रस्त्याच्या बाजूने दिगंबर त्रिभुवन हा वस्तीवर राहत होता. दिगंबरला भारतचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याचा संशय होता. १६ एप्रिल २०१५ रोजी निमगाव येथे गावात हनुमान मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्या दिवशी दिगंबर हा भारतच्या वस्तीवर गेला. अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्याने भारतसोबत भांडण उकरून काढले. या वेळी दिगंबरची पत्नी भारतला म्हणाली, चार-पाच दिवसांपासून तुम्ही आमच्यात काय भांडण लावले, ते मिटवून टाका, असे म्हणत असताना दोघांमध्ये भांडण सुरू झाले व या भांडणात दिगंबरने भारतला चाकूने भोसकले. या घटनेत भारत जखमी झाल्याने त्यास ताबडतोब शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भारत याचे काका भाऊसाहेब त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून शिऊर पोलिस ठाण्यात दिगंबरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक श्रीराम चौधरी यांनी तपास करून वैजापूर येथील सेशन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रत्यक्ष साक्षीदार भारतचा मित्र नारायण त्रिभुवन, अनिता त्रिभुवन व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...