आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोरूम मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - येथील होंडा मोटारसायकल शोरूमच्या मालकाने सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश गुलाबचंद सोनी (५०, रा. रामजीनगर-आमखेडा, ता. सोयगाव) असे आत्महत्या करणाऱ्या हाेंडा शोरूमच्या मालकाचे नाव आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. समिना खान, सहायक सोमा चव्हाण, रितेश पारधी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून असा परिवार आहे. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास भागीनाथ वाघ, दिलीप तडवी, चंद्रशेखर पाटील करत आहेत.
घातपाताची तक्रार
सोनी यांचा मृत्यू आकस्मिक नसून त्यांचा खून करण्यात आल्याची तक्रार मृताच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
खून की आत्महत्या? लवकरच होणार स्पष्ट
गणेश सोनी यांची आत्महत्या की घातपात, हे शवविच्छेदनानंतरचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल. अहवाल प्राप्त होताच खरा प्रकार उघडकीस आणता येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. सहाने यांनी सांगितले.