आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरून लेणीत सापडली बेवारस बॅग, संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - वेरूळ लेणीत असलेल्या कैलास लेणीच्या (नं. १६) प्रवेशद्वारावर रविवारी बेवारस बॅग आढळली. त्यामुळे बॅग कशाची आहे याचा तपास घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसह संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली; पण तपासाअंती बॅगेत सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रविवारी पोलिस कर्मचारी हारुण शेख हे लेणी परिसराची पाहणी करत होते. सकाळी ९.४५ च्या सुमारास कैलास लेणीच्या प्रवेशद्वारावर बेवारस काळी बॅग असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना माहिती दिली. पुरभे यांनीही माहिती वरिष्ठांना देत तातडीने बॉम्बशोधक व नाशक, श्वान पथकास पाचारण करत १० वाजता पथकासह लेणीत हजर झाले. बॉम्बशोधक पथकाने बॅगेची तपासणी केली. त्या सौदर्यं प्रसाधनाच्या वस्तु आढळल्या.