आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही पण आमच्या गावाला करणार स्वच्छ-सुंदर, महिलांचा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - तालुक्यातील हतनूर येथील शंभर महिलांनी आदर्श पाटोदा गावाला रविवारी भेट देऊन येथील गावाची पाहणी केली. सर्व माहिती जाणून घेत आम्ही पण आमच्या गावाला स्वच्छ सुंदर करणार, असा पक्का निर्धार केला.

स्वच्छ भारत मिशन पाणीपुरवठाअंतर्गत पाणंदमुक्त गाव अभियानासाठी हतनूरची निवड झाली आहे. यामुळे येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, स्वच्छता समिती, ग्रामस्थ महिला यांनी संपूर्ण गाव पाणंदमुक्त करण्यासाठी सरसावले आहे. गावात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून पाटोदा येथील माजी सरपंच स्वच्छता अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक भास्करराव पेरे यांचे प्रबोधन हतनूर येथे (सोमवारी) आयोजित करण्यात आले होते. यामुळे गावात शौचालय बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावातील महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे म्हणून येथील शंभरच्या जवळपास महिलांना आदर्श पाटोदा दाखवावे म्हणून ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने या महिलांना पाटोदा गावाची सहल घडवली. या वेळी महिलांनी संपूर्ण गाव फिरून येथील स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड, कचरा व्यवस्थापन, मोफत पिठाची गिरणी आदी मूलभूत नागरी सुविधांबाबत माहिती समजावून घेतली, तर आपल्या गावालाही स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी सहभाग घेऊ, असा निर्धार या महिलांनी केला.
यात विशेष म्हणजे रविवार असतानादेखील अंगणवाडी पर्यवेक्षिका, कार्यकर्त्या, मदतनीस या अावर्जून उपस्थित होत्या. या वेळी पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, पोलिस पाटील लहू मुचक, हतनूर सरपंच कारभारी गवळी, उपसरपंच कैलास अकोलकर, माजी सरपंच एस. बी. अकोलकर, तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर मोहिते, भाऊसाहेब परांडे, विश्वास जाधव, अभयकुमार जैन, ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले, गुलाब फुलारे, शकंुतलाताई पवार, आशा पवार, लीलाबाई शिंदे अादींसह मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.
तरुणांचा सहभाग आवश्यक

^गाव जर खरेच स्वच्छ करायचे असेल तर सर्वात प्रथम घरोघरी शौचालय बांधून घरासमोर एकतरी झाड लावा. प्रत्येक कामाची सुरुवात कोणतेही कारण पुढे करता स्वत:पासून करा. गाव सुधारायचे असेल तर प्रत्येकाकडे शौचालय असलेच पाहिजे तरच गाव स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाईल.
भास्करराव पेरे, माजी सरपंच, पाटोदा.

^हतनूर गावाने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पाणंदमुक्त गाव या अभियानात भाग घेतला असून मोठ्या प्रमाणात गावात ग्रामस्थांकडे शौचालय असून येत्या महिनाभरात उर्वरित शौचालये बांधण्यात येऊन संपूर्ण गाव पाणंदमुक्त करणार असून यासाठी महिलांचा तरुण मंडळींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
साहेबरावअकोलकर, माजी सरपंच, हतनूर.
बातम्या आणखी आहेत...