आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात मोदींच्या \' स्वच्छ भारत अभियान\' ला नागरिकांकडून सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (स्वच्छ भारत अभियान) आज पासून सुरु होणार आहे. जर भारताला अव्वल स्थानावर नेण्याची तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर सर्वात आधी आपल्या आजूबाजूला असलेली घाण स्वच्छ करा. गांधीजींना स्वच्छता प्रिय होती. त्यामुळे मोदींचे हे अभियान गांधी जयंतीला सुरु करण्यात आले आहे. 2019 हे वर्ष भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे या वर्षी महात्मा गांधींची 150 वी जयंती आहे तोपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवण्याचे आव्हान मोदींनी जनतेला केले आहे.
मोदींच्या या स्वच्छता अभियनाचे महत्त्व समजल्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी स्वच्छता करण्याचे मनावर घेतल्याचे चित्र आज (02 ऑक्टोबर) रोजी दिसले. शहरातील रेल्वेस्टेशन भागात असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक कर्मचारी वसाहतील जेष्ठ नागरकांनी सकाळी उठून आपल्या भागातील स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता. यावेळी सोसायटी मधील नको असलेला कचरा साफ करण्यात आला. यामध्ये सोसायटीमधील श्री.पी.पी.कुलकर्णी,श्री.रत्नाकर माहूरकर,श्री.विनायक महाजन,श्री. वसंत बिनोरकर आणि गव्हाळ या सभासदांनी उस्फुर्त सगभाग घेतला.
पुढील स्लाइदवर पाहा, साफसफाई करताना महाराष्ट्र औद्योगिक कर्मचारी वसाहतीतील जेष्ठ नागरिक...