आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swain Flu Patient Serious Issue In Aurangabad Ghati Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाटीत स्वाइन फ्लू संशयित युवतीची प्रकृती चिंताजनक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जहागीरदार कॉलनीतील 18 वर्षीय युवतीची स्वाइन फ्लूमुळे प्रकृती गंभीर असून, तिला गुरुवारी (29 ऑगस्ट) घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात दाखल आले आहे. ही युवती 25 ऑगस्टपासून घाटीत उपचार घेत असून, ती अत्यवस्थ असल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लू वॉर्डात मुकुंदवाडीतील अजून एका 50 वर्षीय संशयित पुरुष रुग्णाला गुरुवारी दाखल करण्यात आले. पुण्याला पाठवलेल्या नमुन्यांचा अद्याप अहवाल आला नाही अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी दिली.