आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीत काय पिकवायचे, किती पिकवायचे याचे नियोजन हवे : शांतीगिरीजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ येथे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत वार्षिक अनुष्ठान परंपरेतील अक्षय्य तृतीया सोहळ्याची गुरुवारी सांगता झाली. - Divya Marathi
वेरूळ येथे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत वार्षिक अनुष्ठान परंपरेतील अक्षय्य तृतीया सोहळ्याची गुरुवारी सांगता झाली.
वेरूळ - प्रत्येक शेतकऱ्याने शेतीत काय व किती पिकवायचे याचे नियोजन सर्वप्रथम होणे गरजेचे आहे. कारण सर्वजण एकाच पिकाचे उत्पादन करतात व मालाला योग्य भाव न मिळाल्याने नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या पिकाचे व किती उत्पादन घ्यावे याचे नियोजन करावे तसेच याबरोबर घेतलेल्या उत्पादनास हमी भावही सरकारने शेतकऱ्यास द्यावा, प्रत्येकाने आपल्या देशाचे नाव भारत असेच उच्चारावे. पंतप्रधान मोदींनीही मेक इन इंडिया ऐवजी मेक इन भारत हाच नारा द्यावा.  प्रत्येक भारतीयाने पाश्चात्त्य संस्कृती टाळून भारतीय संस्कृतीनुसारच मुलांना योग्य संस्कार द्यावेत. आईच्या योग्य संस्काराने काय होऊ शकते हे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यावर समजतेच. विवाह जमवतानाही वधू-वराचे सर्वप्रथम संस्काराचे गुण जुळतात का ते पाहावे, असे प्रतिपादन समाजरत्न  महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी वेरूळ येथे आपल्या प्रवचनातून केले.  जगद््गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी चालू केलेल्या वार्षिक अनुष्ठान परंपरेतील एक परंपरा असलेल्या अक्षय्य तृतीया अनुष्ठान सोहळ्याची समाप्ती गुरुवारी झाली. या वेळी श्री संत जनार्दन स्वामी महाराजांची पालखी भोसले स्मारकासमोरून शिवालय तीर्थ व आश्रम या मार्गाने काढण्यात आली होती.
 
पशुधनासाठी आता रुग्णवाहिकेची मोफत सेवा...
पशुसंवर्धन मंत्री जानकर यांची माहिती
वेरूळ -  राज्य सरकार लवकरच राज्यातील पशुधनासाठी मोफत जागेवर सेवा उपलब्ध व्हावी म्हणून  अद्ययावत ३४९ रुग्णवाहिकांची खरेदी करणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक रुग्णवाहिका थांबणार आहे. शेतकऱ्यांनी या रुग्णवाहिकेस संपर्क केल्यास आजारी पशुधन ज्या जागेवर असेल तेथे वैद्यकीय अधिकारी जाऊन मोफत सेवा देतील आणि हा उपक्रम देशातील पहिलाच उपक्रम राहणार आहे.  हा उपक्रम मुख्यमंत्री व वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळेच शक्य होत आहे तर राजकारण व समाजकारण करताना अध्यात्माचा मोठा आशीर्वाद असावा लागतो आणि तो आशीर्वाद मला समाजरत्न स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून वेळोवेळी लाभत आहे. असाच आर्शिवाद आता आगामी काळात राज्याच्या सेवेसह केंद्राच्या सेवेकरिता मिळावा, असे प्रतिपादन राज्याचे पशु,दुग्ध  व मत्स्य मंत्री महादेव जानकर यांनी वेरूळ येथे केले.  

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, फोटोज... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...