आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीनंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनुदान लाटण्यासाठी अितरिक्त तुकड्यांची मान्यता मिळवून घाणेगावातील स्वामी विवेकानंद विद्यालयाने केलेली चलाखी डीबी स्टारने उघड केली. त्यावर शिक्षणािधकाऱ्यांनी गट शिक्षणािधकाऱ्यांमार्फत शाळेची चौकशीही केली, परंतु चौकशी समिती परतताच शाळेचा कारभार पुन्हा पूर्वीसारखा सुरू झाला आहे.
घाणेगावात २००८ मध्ये कै. शंकरराव घनवट शिक्षण संस्थेची स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळा सुरू झाली. यानंतर संस्थेने प्रत्येक वर्गाच्या दोन-दोन तुकड्या सुरू केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात एक-एकच तुकड्या असून रांजणगावातील विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश दिल्याचे दाखवले, पण त्यांच्या तीन तुकड्या रांजणगावातील श्रीरामचंद्र प्राथमिक विद्यालय संस्थेच्याच हिंदी माध्यमिक शाळेत भरवल्या जात आहेत, तर काही विद्यार्थी बजाजनगरातील एका खासगी शाळेत बसवले जात आहेत. यावर डीबी स्टारने १३ ऑगस्ट रोजी "स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी श्रीरामचंद्र विद्यालयात' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या १६ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. घाणेगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई यांनी या वृत्ताचे बैठकीत जाहीर वाचन केलेे. याबाबत शिक्षणािधकाऱ्यांना जाब विचारून तत्काळ संबंधित शाळेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. शाळांच्या मनमानी कारभाराला चाप देण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
संस्थाचालकाच्या कारमधून परतली चौकशी समिती: स्वामी विवेकानंद शाळेच्या चौकशीसाठी आलेली गट शिक्षणािधकारी व इतर दोन सदस्यांची समिती चौकशी झाल्यानंतर संस्थाचालकांच्याच कारमधून परतले. या चौकशीसंदर्भात गटशिक्षणािधकारी केदारे यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला परंतु त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
सीईओंनी लक्ष घालावे
अधिकारी चौकशी करून परतताच पुन्हा विद्यार्थी इतर शाळेत बसत आहेत. शाळेच्या कारभारावर गटशिक्षणािधकारी जाणिवपूवर्क पांघरुण घालत आहेत. जिल्ह्यात अशा अनेक शाळा असण्याची शक्यता असून अिधकाऱ्यांच्या हितसंबंधांमुळेच हे शक्य होत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अिधकाऱ्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालावे, अशी आमची अपेक्षा आहे.
- संदीप गांगुर्डे, तक्रारदार
भरारी पथक स्थापन करा
माझ्या सर्कलमध्ये असे कुठलेही चुकीचे प्रकार मी कदापी खपवून घेणार नाही. स्वामी विवेकानंद शाळा हे एक उदाहरण आहे. जिल्हाभरात अशा अनेक शाळा असून त्यांची सखोल चौकशी करावी, गरज पडल्यास यासाठी भरारी पथक स्थापन करायला हवे.
- मनोहर गवई, जिल्हा परिषद सदस्य
विद्याथ्यांनी फोडले बिंग
शिक्षणािधकाऱ्यांनी गट शिक्षणािधकाऱ्यांना स्वामी विवेकांनद विद्यालयाची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गट शिक्षणािधकारी केदारे यांनी शाळेची चौकशी केली आहे. चौकशी दरम्यान विद्याथ्यांनी "आपण आजच घाणेगावच्या शाळेत आलाे, शाळा सुरू झाल्यापासून आम्ही रांजणगावात बसत होतो', असे सांगून शाळेचे बिंग फोडले.
मी माझे तपासणीचे काम केले
शिक्षणािधकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार शाळेची चौकशी केली आहे. मला जे सांिगतले, त्याप्रमाणे मी तपास केला आणि आता वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहे. चौकशीनंतर पुन्हा या शाळेचे विद्यार्थी रांजणगाव व बजाजनंगरातील शाळांमध्ये बसत असतील तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी जेव्हा तपासणी केली तेव्हा विद्यार्थी शाळेत हजर होते.
.एन. आर. घोडके, गटशिक्षणािधकारी