औरंगाबाद वाळूज: राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती वाळूज औद्योगिक परिसरातील शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने शालेय साहित्य वाटप, शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त छोडेस्वार जिजाऊंच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी आकर्षणाचा विषय ठरली होती.
राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळा
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. उपसरपंच मोहिनीराज धनवटे, भीमराव कीर्तिकर, दीपक बडे, दीपक सदावर्ते, टी.के.शिंदे, किसन शिंदे, गणेश पवार, मुख्याध्यापक कुमार बिरदवडे, सविता घुगे यांनी प्रतिमा पूजनाने वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम-पूजा वानखेडे, द्वितीय-शीतल पवार, तृतीय-क्षितिज कांबळे तर माध्यमिक गटातून प्रथम-शीतल पारखे, द्वितीय लक्ष्मी जाधव, तृतीय उमाकांत पवार उत्तेजनार्थ दामिनी बाजगिरे यांनी यश संपादन केले. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
जय भद्रा विद्यालय
रांजणगावात जयभद्रा विद्यालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन योगगुरू चांगदेव सोनवणे,राहुल राहिंज, मुख्याध्यापक कृष्णा दाभाडे यांनी केले. या वेळी राजमाता विवेकानंद यांच्या वेशभूषेमध्ये गीता भराडे, हर्षदा धडे, योगिता गायकवाड, गायत्री मगर, यश जोन्वाल, महेश नागे, प्रद्युम्न गाडेकर या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. सूत्रसंचालन मनीषा सोनवणे यांनी तर आभार मनीषा तांगडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सीमा हावळे, अंकुश तुपे, स्वाती तुपे, स्वप्निल माळी, अाशा पिंगळे, गणेश गायकवाड, ज्योती गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
कोमल स्वप्न महिला सेवाभावी संस्था
राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत शिबिराची सुरुवात करण्यात आली. जायंट्स ग्रुप ऑफ वाळूजमहानगर कोमलस्वप्न महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित शिबिरात शंभरावर महिलांची मोफत अारोग्य रक्त तपासणी तसेच औषध वितरण करण्यात आले. या वेळी डाॅ.जी.एस. कुलकर्णी, तेजस्विता पंडित, अनुराधा दानवे, संजय शेळके, प्रकाश जाधव, नागेश कुठारे, सुनील मेघारे, साहेबराव गुंजाळ, डाॅ. शंकर सुरवसे, नथू पतंगे, सुनीता दानवे, सुनंदा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी रेखा सूर्यवंशी, लता बन, शोभा प्रधान, अलका मेटे, कांचन मुंढे, सिंधू सरवदे, मनीषा देसाई यांनी परिश्रम घेतले.
श्रीगजानन विद्यालय, रांजणगाव
जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. मुली जिजाऊंच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. संस्थापक अध्यक्ष आय.जी.जाधव, सरपंच मंगला लोहकरे, सुरेखा बस्वदे, शैलेंद्र यादव, हनुमान जाधव, सुरेश म्हस्के, शालिनी वाकोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहीद भगतसिंग प्रा. शाळा
मुख्याध्यापिका मीनाश्री मानकापे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी अर्जुन पळसकर,अर्चना तरसे,नामदेव इंदुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज वैभव प्रतिष्ठान
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस निरीक्षक नाथा जाधव जिल्हाध्यक्ष अमोल काळे यांनी केले. या वेळी बजाजनगरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकणारे पुस्तक तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी किशोर देशमुख, अक्षय जाधव, सचिन काळे, अनिरुद्ध जगताप, नानासाहेब राेठे, अनिल सोनवणे, रवींद्र जाधव उपस्थित होते.
योगेश्वरी विद्यालय
मुख्याध्यापक बाजीराव खोसे, अनिल तुपे, मच्छिंद्र पवार यांनी जिजाऊ विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन केले. या वेळी विद्यार्थी विवेकानंद जिजाऊंच्या वेशभूषेत आले होते. सूत्रसंचालन उज्ज्वला देशमुख यांनी केले. आभार संदीप फुलसे यांनी मानले.
साईनाथ विद्यालय, वाळूज
प्राचार्य एम.पी.सुरगडे यांनी प्रतिमा पूजन केले. या वेळी प्रा.एस.जे.रोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या वेशभूषेत आलेल्या एल.सी.गोयल या विद्यार्थिनीने भाषण केले. सूत्रसंचालन संध्या पाटील यांनी तर आभार पूजा धनक यांनी मानले.
शहीद भगतसिंग विद्यालय, बजाजनगर
मुख्याध्यापक नितीन देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी चक्रधर डाके यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिजाऊंच्या वेशभूषेत आलेल्या जिजाऊ दुधाट या चिमुकलीने लक्षवेधी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शीतल घोडके यांनी केले. राजेंद्र मघाडे यांनी आभार मानले.
युरेकाइन्फोसिस स्कूल
सुनीता मेहेत्रे आणि स्वाती लहाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक बस्वराज पटणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिजाऊंच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
देवगिरी नगर सिडको
येथील शिवपुत्र प्रतिष्ठान सत्यशोधक बहुजन संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजनानंतर गणेश घुले, प्रा.बी.जी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी चक्रधर डाके होते. या वेळी ग्रामपंचायत सदस्य रमाकांत भांगे, प्रकाश निकम, अमोल काळे, राम पाटोळे आदी उपस्थित होते.