आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतक घोडा चौकातील ठेकेदारावर तलवारीने हल्ला: भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चेतक घोडा चौकात आर्थिक व्यवहारातून ठेकेदारावर फिल्मीस्टाइलने तलवारीने केलेल्या हल्लाप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष सचिन झवेरी आणि अन्य चौघांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुलदीपसिंह अजितसिंह ठाकूर (३२, रा. ज्योती प्राइड ) यांच्यावर गुरुवारी रात्री तलवारीने हल्ला झाला होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ठाकूर यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. 

ठाकूर हे शुक्रवारी सायंकाळी मित्रांसोबत एन-३ भागात प्रतीक बावनकर कुशल संचेती यांना भेटण्यासाठी गेले होते. या वेळी तेथे युवराज सिद्ध (रा. राजाबाजार, धावणी मोहल्ला) आला होता. त्याने ठाकूर यांचे मित्र बावनकर संचेतीकडे पूर्वी झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैशांची मागणी केली. ठाकूर यांनी पैसे वापस करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी मागितला. परंतु विनाकारण मध्यस्थी केल्याने सिद्ध आणि ठाकूर यांच्यात वाद झाला. वाद तेथेच मिटवून सिद्ध ठाकूर निघून गेले. सिद्धने ठाकूर यांना रात्री सव्वाआठ वाजता कॉल करून चेतक घोड्याजवळ बोलावून घेतले. ठाकूर त्यांच्या अन्य मित्रांसोबत गेले असता सिद्धसोबत भाजप युवा मोर्चाचा शहराध्यक्ष सचिन झवेरी आणि प्रदीप मांडेसह अन्य एक जण तेथे आले होते. तेथे बाचाबाची झाल्यावर सिद्धने चाकू काढून ठाकूर यांच्यावर वार केले. जीव वाचवण्यासाठी पळण्याच्या प्रयत्नात ठाकूर यांचा झवेरी, सिद्ध आणि मांडे एकाने पाठलाग करत आणखी मारहाण केली. ठाकूर यांनी एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून जवाहरनगर ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना घाटीत रुग्णालयात दाखल केले. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे उपनिरीक्षक के. डी. महांडुळे यांनी सांगितले. 

राजकारणही पेटले 
राजपूतयुवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेशी झवेरीचा संबंध नसल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...