औरंगाबाद - स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र आणि आंतरराष्ट्रीय पूर्णवादी युवा फोरम यांच्या वतीने आयोजित स्वा. सावरकर विश्व संमेलन सिंगापूर येथे (9 नोव्हेंबर) होणार असल्याची माहिती सावकर मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सावकरांचे चरित्र आणि त्यांचे कार्य देशात आणि विदेशात कळावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सिंगापूर येथील महाराष्टÑ मंडळाने यासाठी सहकार्य केले आहे. संमेलनासाठी सिंगापूरचे सांस्कृतिक मंत्री, प्रतिष्ठित नागरिक आणि भारतीयांना आमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनासोबत सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशात पर्यटनदेखील आयोजित करण्यात आले आहे. 11 दिवसांचे नियोजन असून ‘कॉक्स अॅँड किंग’ हे या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणार आहे. मागील वर्षी हे संमेलन लंडन येथे घेण्यात आले.पत्रकार परिषदेला सावकर मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर, सुभाष कुमावत, विजय जहागीरदार, किरण सराफ आणि कॉक्स अॅँड किंगचे व्यवस्थापक प्रसाद देशपांडे यांची उपस्थिती होती. या संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी suradkarbhau@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.