आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विमिंग पूल शुल्क वाढवले, ७०० रुपयांवरून १८०० रुपये वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वेच्छानिधी आणि रेटलिस्टच्या फुटकळ कामांवर तासभर घसा खरवडून चर्चा करणाऱ्या स्थायी समिती सदस्यांनी एका ओळीचीही चर्चा करता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला भगदाड पाडणारा जलतरण तलावाचे शुल्क अडीचपटींनी वाढवण्याचा निर्णय घेऊन टाकला. आता सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलावासाठी दरमहा ७०० रुपयांऐवजी तब्बल १८०० रुपये मोजावे लागणार आहेत.

आज महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होती. त्यात पहिला तास स्वेच्छा निधी रेटलिस्ट-ए वन या मलईदार विषयांवर सगळेच सदस्य घसा खरवडून भांडत होते. अगदी नगरसेवकपद नको असे म्हणण्यापर्यंत हे नगरसेवक तावातावाने भांडत होते. याच सदस्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा करण्याच्या एका प्रस्तावाला एका ओळीचीही चर्चा करता मंजुरी देऊन टाकली.

सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव मनपा चालवते. या तलावाचे शुल्क अडीचपटींहून अधिक वाढवण्याचा हा प्रस्ताव प्रशासनाने ऐनवेळी आणला. त्यावर काहीही चर्चा झाली नाही तो मंजूर झाला. या प्रस्तावानुसार आता औरंगाबादकर नागरिकांना मनपाकडून मिळणाऱ्या मोजक्या चांगल्या सेवांपैकी एकासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. तलावासाठी मासिक शुल्क ७०० रुपये होते ते १८०० रुपये केले जाणार आहे. त्रैमासिक शुल्क १८०० वरून थेट हजार रुपये करण्यात आले आहे, तर वार्षिक शुल्क हजारांवरून चक्क १० हजार करण्यात आले आहे. याशिवाय कौटुंबिक पॅकेजचा दरही दरमहा १५०० रुपयांवरून थेट हजार रुपयांवर नेऊन ठेवण्यात आला आहे.

समर्थनासाठी तुलनात्मक चित्र : सर्वसामान्यनागरिकांना परवडेल अशा दरात जलतरणाची सुविधा फक्त मनपाच्याच या जलतरण तलावावर मिळायची. बड्या हाॅटेल्स क्लब्जचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. आपल्या दरवाढीचे समर्थन करताना मनपाने इतरांचे शुल्क किती आपले किती कमी हे दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यानुसार हाॅटेल अजंता अॅम्बेसेडरच्या तलावाचे मासिक शुल्क हजार, राकाजचे २५००, औरंगाबाद जिमखान्याचे ३५०० तर एमजीएमचे हजार रुपये मासिक शुल्क आहे. मनपाच्या तलावाचे शुल्क ७०० रुपये आहे, असे या तक्त्यात दाखवण्यात आले आहे.

पाणी विकत घ्यावे लागते म्हणून
याशुल्कवाढीचे कारण देताना प्रशासनाने म्हटले की, जलतरण तलावावर दरवर्षी ४२ लाख रुपयांचा खर्च होतो. १९९४ ते २००८ पर्यंत सरासरी ११ लाख रुपये उत्पन्न या तलावाकडून मिळाले. २०१२ मध्ये हे उत्पन्न ५३ लाख ५५ हजार ६२५ रुपये झाले. पण आतापर्यंत तलावाला मनपा फुकटात पाणी देत असे. आता पाण्याचे खासगीकरण केल्याने त्यासाठी मनपाला मोठा पैसा खर्च करावा लागतो. शिवाय महागाई इतर खर्चांत झालेली वाढ यामुळे वाढ सुचवण्यात आली आहे.