आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच स्क्रीनिंग सेंटरवर 12 तास सेवा मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वाइन फ्लूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात यावी, म्हणून सकाळी ८ ते रात्री 8 वाजेपर्यंत स्क्रीनिंग सेंटरवर स्वाइन फ्लू तपासणी सुरू ठेवण्याचे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना दिले.
खासदार खैरे यांनी सुभेदारी विश्रामगृहामध्ये रविवारी आढावा बैठक घेतली. या वेळी महापौर कला ओझा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चव्हाण, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण, डॉ. मंगला बोरकर यांची उपस्थिती होती. खासदार खैरे म्हणाले, मनपा आरोग्य विभागाने अधिक संवेदनशीलपणे कार्य करणे अपेक्षित आहे. पाचही स्क्रीनिंग सेंटरवर साथ असेपर्यंत रात्री ८ पर्यंत सेवा द्यावी.
मनपाची बनवाबनवी
ज्या भागात स्वाइन फ्लू रुग्णांचा मृत्यू झाला तेथे पथकाने परिसरातील नागरिकांची तपासणी केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात अशी कुठलीही तपासणी झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. बीएमसी बँकेत मनपा कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेतला असेही कुलकर्णी म्हणाल्या. प्रत्यक्षात अशी कुठलीही तपासणी झाली नसल्याचे बँक प्रशासनाने सांगितले आहे.