आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ गर्भवतींना स्वाइन फ्लूची लस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वाइनफ्लूमुळे गेल्या वर्षी शहरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. तेव्हा प्रशासनाकडे स्वाइन फ्लू लस उपलब्ध नव्हती. यंदा स्वाइन फ्लू लस उपलब्ध असल्याने हायरिस्क असलेल्यांना ती प्रामुख्याने दिली जावी अशी सुविधा शासनाने केली. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात गर्भवतीसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली असून आतापर्यंत १६ गर्भवतींनी लसीकरण करून घेतले.

घाटी आणि एन-८ येथील महानगरपालिका रुग्णालयात ही लस उपलब्ध आहे. घाटीत तर मनपा रुग्णालयात १३ जणींनी याचा लाभ घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड यांच्या निरीक्षणात शहरात लसीकरण केले जात आहे. तर विभागात उपसंचालक कार्यालयात व्यवस्था केली आहे.

ऑगस्टपासून विभागात ११ तर शहरात मृत्यू
ऑगस्टमहिन्यापासून स्वाइन फ्लूने विभागात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी मृत्यू घाटीत झाले आहेत. अर्थात, हे रुग्ण बाहेरगावचे होते. तरीही शहरवासीयांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण यांनी केले आहे.