आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वाइन फ्लूचा शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय अधिकारी रवींद्र साळुंके यांचा मंगळवारी रात्री स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर परिसरात आणखीनच दशहत पसरली आहे. साळुंके यांच्यासोबत ज्या चार वरिष्ठ श्रेणी लिपिकांचे स्वॉब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील एकाचा अहवाल खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला होता. त्या लिपिकावर एमआयटी हॉस्पिटलमध्ये उपचार करून बुधवारी सुटी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्वाइन फ्लूच्या धास्तीने बुधवारी सकाळी सहा वाजता संपूर्ण आयुक्तालयाच्या परिसरात फॉगिंग करण्यात आले. तसेच पासपोर्ट कार्यालयाच्या भिंतीवर स्वाइन फ्लूपासून स्वत:चा कसा बचाव करता येईल याचे फलक लावण्यात आलेले आहे. साळुंके यांच्या निधनानंतर पोलिस आयुक्तालयात मोठय़ा प्रमाणात दहशत पसरली. यापूर्वीच एका वरिष्ठ र्शेणी लिपिकाला एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. चार संशयितांपैकी मंगळवारी रात्री आणखी एका वरिष्ठ र्शेणी लिपिकालादेखील एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तर आणखी तिघांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. दरम्यान, आज दुपारी 3 वाजता आयुक्तालयातील 260 कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या डॉ. संगीता पाटील, डॉ. बाबासाहेब उनवणे, डॉ. स्मिता नळगीरकर, डॉ. अंजली कराड, डॉ. अमरज्योती देशमुख, डॉ. बाळकृष्ण राठोडकर आणि डॉ. प्रेरणा बढेरा यांचे पथक होते. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांची तपासणी केली.


घाबरून जाण्याचे कारण नाही
पोलिस आयुक्तालयातील कर्मचार्‍याचा स्वॉबचा अहवाल खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करून त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. डॉ. आनंद निकाळजे, एमआयटी हॉस्पिटल, औरंगाबाद.