आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतक घोडा चौकात दहा जणांच्या टोळीचा हैदोस, ठेकेदार तरुणावर तलवारीने वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चेतकघोडा परिसरात जवळपास आठ ते दहा जणांच्या टोळीने गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास तीस वर्षीय ठेकेदार कुलदीप ठाकूर (३० रा. ज्योती प्राइड, सातारा) यांच्यावर तलवार, चाकूने हल्ला केला. तरुणाने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निहोत्र चौकाकडे धाव घेतली. परंतु हल्लेखोरांनी तरुणाचा अग्निहोत्र चौकापर्यंत पाठलाग करत त्याला मारहाण सुरूच ठेवली. नागरिक गोळा होत असल्याचे पाहताच हल्लेखोर पळून गेले. ठेेकेदारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

गुरुवारी सायंकाळी ठाकूर यांना फोन आला होता. कॉलवरील व्यक्तीने कंत्राटाचे काम असून चेतक घोडा चौकात भेटू, असा निरोप दिला. ठाकूर मित्रांसोबत तेथे गेले. तेथे हल्लेखोरांनी त्यांना हेरून तलवारीने सपासप वार सुरू केले. ठाकूर यांच्या डोके, कपाळ खांद्यावर गंभीर दुखापत झाली. आर्थिक व्यवहारातून हा वाद झाल्याची शक्यता असून त्यांची प्रकृती सुधारल्यावर जबाब नोंदवू, असे असे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...