आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात स्वाइन फ्लूसदृश अाजाराची लक्षणे असलेल्या रुग्णसंख्येत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वातावरणातीलबदल संसर्गजन्य अाजारांच्या संख्येत वाढ हाेत असताना गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लू सदृश अाजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाणदेखील वाढत अाहे. दाेन- तीन दिवसांच्या तापानंतर अचानक श्वसनाचा त्रास वाढलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. खबरदारी म्हणून अाैरंगाबाद येथील घाटी तर मुंबईला उपचारासाठी पाठवले जात अाहे. तर जिल्हा रुग्णालयात अालबेल असून एकही संशयित रुग्ण दाखल नसल्याचे शासकीय उत्तर मिळत अाहे. 

वातावरणातील बदल, पावसाची उघडीपमुळे सर्दी, ताप, खाेकला याचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या कायम अाहे; परंतु गेल्या महिनाभरात हातपाय दुखणे, पिवळा पांढऱ्या रंगाचा कफ पडणे, राेगप्रतिकार शक्ती कमी हाेऊन प्रचंड अशक्तपणा येणे. तसेच न्यूमाेनिया हाेऊन रक्तातील अाॅक्सिजनचे प्रमाण कमी हाेण्याचे प्रमाण वाढत अाहे. गेल्या काही दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू सदृश अाजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे अाहे. 

नमुने तपासणे गरजेचे 
एकामहिलेची प्रकृती खराब झाल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले हाेते. गेल्या महिनाभरात विशिष्ट लक्षणे असलेल्या प्रकृती नाजूक असलेल्या रुग्णांना अाैरंगाबाद येथील घाटी तसेच मुंबईला रवाना करण्याचा सल्ला दिला अाहे. शहरातील मल्टी सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्येही अशा रुग्णांवर उपचार केले जात अाहे. वास्तविक शासकीय यंत्रणेकडून स्वाइन फ्लूसंदर्भात जनजागृतीची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

पुण्यात हाेते तपासणी 
जळगावजिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू सदृश अाजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांना पाठवले असता, अशा रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयाेगशाळेत पाठवले जातात. वैयक्तिक पातळीवर हे नमुने पाठवले असता त्याचा खर्च अधिक असताे. म्हणून शासकीय यंत्रणांचा वापर केला जाताे; परंतु सिव्हिल मार्फत पाठवलेल्या रुग्णांचे नमुने पाठवल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास उशीर हाेत असल्याचे सांगितले जाते. 

जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण नाही 
जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण अालेला नाही. त्यामुळे थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात अालेले नाही. 
- डाॅ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक 
 
स्वाइन फ्लूची लक्षणे असलेले रुग्ण वाढले 
गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली अाहे. सर्दी, खाेकला, कफ पडणे, अंगदुखी असा त्रास असलेल्या रुग्णांवर उपचार केला जात अाहे. रक्तातील अाॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवले जात अाहे. 
- डाॅ.संजय महाजन, फिजिशियन 

रुग्णांच्या संख्येत २० ते २५ टक्के वाढ 
गेल्याकाहीदिवसात स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत २० ते २५ टक्के वाढ झाली अाहे. संशयित रुग्ण येत असून त्यांच्यावर उपचार केले जात अाहेत. ते दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर घरी पाठवले जाते. दरम्यान, लक्षणे जास्त दिवसाची असल्यास त्यांचे नमुने तपासणीसाठी अाैरंगाबादला पाठवण्याचा सल्ला दिला जात अाहे. हात धुणे, वारंवार नाकाजवळ हात लावणे, अाराम करणे गरजेचे अाहे. 
- डाॅ.राहुल महाजन, फिजिशियन. 

नागरिकांनो, या लक्षणांवर ठेवा लक्ष 
ताप १०० ते १०२ अंश राहणे, सहसा अंगदुखी असणे, नेहमी डाेकेदुखी राहणे, थकवा अशक्तपणा दाेन, तीन अाठवडे राहणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, सर्वसाधारण अथवा केव्हा केव्हा छातीत दुखणे, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो. 

ही घ्या काळजी 
हात नेहमी साबण-पाण्याने धुवा, गर्दीमध्ये जाणे टाळा, स्वाइन फ्ल्ू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे, खोकताना- शिकताना तोंडाला रुमाल लावावा, भरपूर पाणी प्यावे पुरेशी झोप घ्यावी, पौष्टिक आहार घ्यावा, हस्तांदोलन अथवा आलिंगन देण्याचे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे, आजारी असल्यास कमी लोकांशी संपर्क ठेवावा घरीच विश्रांती घ्यावी, आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत, तोंडावर मास्क लावावा. 
बातम्या आणखी आहेत...