आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T Point To Basastend Point Rastace Stopped Working

टी पॉइंट ते बसस्थानक अंतर्गत रस्ता रखडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीबी स्टार- हर्सूल टी पॉइंट ते सिडको बसस्थानक या अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले होते. यामुळे पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत होता. शहरातील रस्त्याचे काम करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 30 कोटींच्या निधीतून हर्सूल जवळील विद्युत महामंडळाच्या कार्यालयापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. अंतर्गत रस्त्याचे सपाटीकरण करून खडी टाकण्यात आली. मात्र, त्यानंतर या रस्त्याच्या कामाकडे कानाडोळा करण्यात आला. आज दोन महिने उलटून गेले, तरी कामाला गती मिळालेली नाही. टाकलेली खडीदेखील आता ठिकठिकाणी पसरल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे रस्तेदेखील अरुंद झाले आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत. तरी या रस्त्याच्या कामाला गती देऊन डांबरीकरण तातडीने करण्यात यावे,अशी मागणी राजेंद्र साळवे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सावित्रीनगर परिसरात साठले कच-याचे ढीग

डीबी स्टार- वॉर्ड क्रमांक 23, सावित्रीनगरात बाजार भरण्याच्या ठिकाणी कच-याचे ढीग साचलेले असतात. शिवाय या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरणही रखडले आहे. बाजाराकडून सावित्रीनगरात जाण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेले पथदिवेदेखील बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो. या समस्या दूर करण्याची मागणी पांडुरंग वाघ यांनी केली आहे. याबाबत नगरसेवक संजय चौधरी यांना विचारले असता, लवकरच या समस्या सोडवण्यात येतील, असे ते म्हणाले.

काय म्हणतात जबाबदार
सुरुवातीला डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर होता. त्यानंतर व्हाइस टॅपिंग करण्याचा मुद्दा मांडल्यामुळे डांबरीकरणाचा प्रस्ताव थांबवून व्हाइस टॅपिंगचे टेंडर काढण्यात आलेले आहे. यासाठी रस्त्याचे काम रखडलेले असून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल.
- राज वानखेडे, नगरसेवक

गणेश कॉलनी परिसराची साफसफाई
वॉर्ड क्रमांक 29, गणेश कॉलनी परिसरातील औरंगाबाद पंचायत समितीकडून सलीम अली सरोवरकडे जाणाºया रस्त्यावरील फुटपाथवर गाजरगवत फोफावले होते. याबाबत डीबी स्टारने 3 जानेवारी 2014 रोजी ‘गाजर गवतामध्ये हरवले फुटपाथ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत
वॉर्ड अधिकारी डी. डी. सूर्यवंशी यांनी तत्काळ स्वच्छता निरीक्षकांना सूचना देऊन गाजर गवताची विल्हेवाट लावली.