आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्वेंटी-२० वर्ल्डकपचे आमिष; खेळाडूला ८० हजारांना गंडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी िनवड झाल्याची थाप मारून चार भामट्यांनी खेळाडूला ८० हजारांना गंडवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौघांवर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेने पवन सुलताने, प्रमोद उघडे (रा. सिडको एन-४) यांना मंगळवारी अटक केली. संजय डोंगरे, सुधीर जाधव फरार आहेत.
भायगाव (ता. देगलूर) येथील व सध्या शासकीय तंत्रनिकेतनमहावदि्यालयात मेकॅनकिलच्या अभ्यासक्रमात शकिणाऱ्या राजवर्धन सोनकांबळे याने २०१२ मध्ये दैनिकांत क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूची निवड होत असल्याची जाहिरात वाचली. ट्वेंटी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या नावाने जाहिरात देण्यात आली होती. ट्वेंटी-२० सामन्यासाठी अंडर १९ मधील संघात खेळाडूंची चाचणी असल्याचे त्यात नमूद होते. त्यामुळे राजवर्धनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वदि्यापीठाच्या मैदानावर चाचणी दिली. यात त्याची निवड झाली. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष संजय डोंगरे, सल्लागार पवन सुलताने, सचिव सुधीर जाधव, सहसचिव प्रमोद उघडे यांच्याशी ओळख झाली. याचा फायदा घेत त्याच्याकडून पैसे उकळले.
निवडीचे बनावट पत्र
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, १० हजार रुपये भरून राजवर्धन नेपाळला खेळण्यासाठी गेला. तेथून आल्यानंतर श्रीलंका येथे ट्वेंटी-२० वर्ल्डकपसाठी जायचे असल्याची थाप त्याला मारण्यात आली. असोसिएशनच्या वतीने २०१३ मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथील स्पर्धेेसाठी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. ही स्पर्धा १८ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी सोनकांबळेकडून जाधवने टप्प्याटप्प्याने ८० हजार रुपये घेतले व सोनकांबळेचा पासपोर्टही जमा करून घेतला.