आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या कामाकडे दुर्लक्ष; तहसीलदार वंदना निकुंभ निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात हयगय करण्याच्या तक्रारींमुळे तहसीलदार वंदना निकुंभ यांना निलंबित करण्यात आले. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी आदेश काढले. टँकर, मनरेगाची कामे करण्याबाबत सातत्याने मागणी होऊनही तहसीलदार टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, खासदार चंद्रकांत खैरे यांनी तक्रारी केल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...