आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस डॉक्टरांना कारवाईचा ‘डोस’ कधी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाप्रशासनाच्या दप्तरी जिल्ह्यामध्ये एकूण १३९ बोगस डॉक्टरांची नोंद आहे. तसा अहवालच पुनर्विलोकन समितीने दीड वर्षापूर्वी सादर केला. मात्र, आतापर्यंत फक्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिलेले कारवाईचे आदेशही हवेतच विरले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींचे मनोबल वाढत असून प्रशासन त्यांच्याविरुद्ध कारवाई ‘प्रॅक्टिस’ कधी करणार, असा सवाल उपस्थित होतो.
महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहे. मात्र, शासनाच्या या नियमांना केराची टोपली दाखवत अनेकांनी बोगस वैद्यकीय व्यवसाय जोमाने सुरू ठेवला आहे. दरम्यान, पुनर्विलोकन समितीने अहवाल सादर करून बोगस डॉक्टरांची यादीच सादर केली होती. त्यानंतर या समितीचे अध्यक्ष तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे असे बेकायदेशीर डॉक्टर सर्रासपणे आपला धंदा करत आहेत.

कारवाईथंडबस्त्यात : राज्यातीलप्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आणि तालुका पुनर्विलोकन समित्यांची स्थापना करण्यात आली. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सचिव जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक असतात, तर तालुका समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असतात. सप्टेंबर २०१३ रोजी झालेल्या समितीच्या आढावा बैठकीत जिल्ह्यामध्ये १३९ बोगस डॉक्टर असल्याचे दिसून आले. प्रत्येक तालुक्याची यादीच या वेळी सादर करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालामधून सर्वाधिक बोगस डॉक्टर सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यात असल्याचे समोर आले. या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विक्रम कुमार यांनी आरोग्य विभागाला दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत कारवाई थंडबस्त्यात ठेवण्यात आली आहे.
यांच्यावर झाली कारवाई : आरोग्यविभागाने कन्नड येथील गंगापूर येथील दिनकर बानखेडे आणि अाबेद खान पठाण यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
चुकीचा उपचार ठरतो बोगस : पदवीअसली तरी चुकीचा उपचार करणे हेदेखील बोगस व्यवसायात मोडते. उंची वाढवून देतो, असे सांगून रुग्णांची दिशाभूल करणे हेदेखील वैद्यकीय व्यवसायात बोगस ठरते. यावर कारवाई करण्याचे अधिकार समितीला आहेत.

थेट सवाल
- बोगस व्यावसायिकांवरकाय कारवाई केली?
बैठकीतझालेल्या निर्णयानंतर सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
- आतापर्यंत कितीजणांवर गुन्हे दाखल केले?
आतापर्यंतजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- उर्वरित लोकांवरकधीपर्यंत कारवाई?
प्रक्रियासुरू करण्यात आली आहे. माझा प्लॅन वेगळा आहे. तसे पत्र मी नुकतेच तालुका समित्यांना पाठवले आहे. लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील.
- तुमचा प्लॅनकाय आहे?
मीनव्याने काम सुरू करणार आहे. पोलिसांची मदत घेऊन धडक कारवाई करण्याचा प्लॅन आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूद
बोगसव्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनाने महाराष्ट्र अधिनियम १९६१ मधील कलम ३३ ३८ मध्ये सुधारणा केली आहे. अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याच्या शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे सर्व गुन्हे दखलपात्र अजामीनपात्र ठरवण्यात आले आहेत. १३ मार्च २००१ पासून हा नवीन कायदा अमलात आला आहे. सुधारित कायद्यात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय करताना पहिल्यांदा आढळून आल्यास शिक्षा ही दोन वर्षांपेक्षा कमी नसून किमान वर्षांपर्यत करण्यात आली आहे.

काय आहे नियम?
- केंद्र शासनाने जानेवारी २००४ च्या निर्णयानुसार अॅलोपॅथी, आयुर्वेद सिद्ध, युनानी, होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथी योग या चिकित्सा पद्धतींना मान्यता दिली आहे. तसेच अॅक्युपंक्चर हिप्नोथेरपी या आरोग्य विज्ञानाच्या दोन शाखांना स्वतंत्र चिकित्सा पद्धती म्हणून मान्यता दिली नाही.
- त्यांना उपचार पद्धतीचे प्रकार म्हणून मान्यता आहे. याबाबत केंद्र शासनाचे असे निर्देश आहेत की, या दोन शाखांमधील व्यवसाय नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक अथवा योग्य प्रकारे प्रशिक्षित व्यक्ती करू शकते.
- या दोन्ही शाखांचा अभ्यासक्रम केवळ सर्टिफिकेट कोर्स स्वरूपाचा असावा. तो पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम असू नये. हे अभ्यासक्रम केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठीच चालवण्यात यावेत, असेही आदेश आहेत. तसेच त्या-त्या राज्यातील मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे. याखेरीज अन्य कुठल्याही वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना बोगस असे ठरवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...