आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Take Before Police Leave, Then Raised Stage Ganpati Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी पोलिसांची परवानगी घ्या, मगच गणेशासमोर स्टेज उभारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पोलिसआयुक्त अमितेशकुमार यांनी सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्तालयात शहरातील गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यंदाचा गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. याबरोबरच नियम आणि अटींविषयी मार्गदर्शन केले.
पोलिस आयुक्तांनी केल्या गणेश मंडळांना सूचना
गणेशमंडळांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अवाजवी खर्चाला आळा घालावा आणि तो निधी दुष्काळ निवारणाच्या कामासाठी द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद जिल्हा प्रेरणा मेळाव्यात करण्यात आले.

समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा हा नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवारी (ता. सहा) औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांनी अवाजवी खर्चांना आळा घालून तो निधी दुष्काळ निवारणासाठी देण्यात यावा, असे आवाहन समितीने करावे, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या निमित्ताने काही मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींएेवजी शाडू मातीच्या गणेशमूर्ती वापरण्यात याव्यात, त्याचप्रमाणे निर्माल्य संकलन करून त्याचे सेंद्रिय खत तयार करण्यात यावे, ध्वनी प्रदूषण टाळावे, विद्युत रोषणाई कमीत कमी करून वीज बचत करावी, असाही ठराव या बैठकीत घेण्यात आला.

कक्ष : जेथलियाटॉवर, गुलमंडी (सिटी चौक, शहागंज, औरंगपुरा, छावणी) या क्रमांकावर संपर्क (७०६६०४२३१५, ७०६६०४२३८२) साधावा.
कक्ष : महावितरणतर्फेदाेन कक्ष स्थापन केले आहे.क्रांती चौक (दूध डेअरीजवळ) संपर्क (७०६६०४२३७६, ७०६६०४२३७७).

वीजपुरवठ्यासाठी लागणारी कागदपत्रे, रक्कम
अ-१फॉर्म (महावितरणकडे उपलब्ध) {विद्युत संचाची मांडणी केल्याचा टेस्ट रिपोर्ट (मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून) {पोलिस आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र. {प्रतिजोडणी आकारणी २९० रुपये. अनामत रक्कम २००० रुपये (जोडभार किलोवॅटपर्यंत) {त्यापुढील प्रत्येक किलोवॅट जोडभारासाठी हजार रुपये. कागदपत्रे तसेच जोडणी आकार अनामत रक्कम भरण्याची पावती प्राप्त होताच एक दिवसात तात्पुरता वीजपुरवठा करण्यात येईल. मंडळाने देखाव्यासाठी संच मांडणी वायरिंगची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडून करून घ्यावी. तारांवर आकडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये.
महावितरणतर्फे केल्या जाणाऱ्या योजना
वेळ : २४तास {नियंत्रणकक्ष : {कालावधी स्थापन : १४-२९सप्टेंबर

गणेशभक्तांनी परवानगी घेणे बंधनकारक
वर्गणीगोळा करण्यासाठी ४१-क अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
विहितनमुन्यात अर्ज.
दोन पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड)
जागामालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
पत्त्याचा पुरावा.
ठरावाची प्रत.
मागील वर्षाचा हिशेब.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन
गणेशोत्सवाच्याकाळात स्टेज, मंडपाच्या परवानगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना आणि महावितरणतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शहरातील गणेश मंडळांनी त्यांची कागदपत्रे घेऊन परवानगीसाठी पोलिस आयुक्तालयाच्या बाजूला असलेल्या अलंकार हॉलमध्ये ११ सप्टेंबरपर्यंत जमा करत परवानगी घ्यावी, अशी सूचना पोलिस आयुक्तांनी केली आहे.

गणेश मंडळासाठी ही कागदपत्रे आवश्यक
गणेशमंडळाचा अर्ज.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र.
मंडळ ज्या भागात आहे त्या संबंधित पोलिस ठाण्याचे अथवा शहर वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र.
अध्यक्ष, सचिव यांचे फोटो आयडी (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल इतर आवश्यक कागदपत्रे)
खासगी जागेवर गणेश स्थापना करावयाची असल्यास मिळकतधारकाचे जागेचे कागदपत्र ना हरकत प्रमाणपत्र.
गणेश स्थापना ज्या ठिकाणी करावयाची आहे, त्या ठिकाणाचा स्थळदर्शक नकाशा.
मागील वर्षी याच ठिकाणी गणेश स्थापना होती काय? असल्यास त्याबाबतीत मंडळाचे स्वतंत्र पत्र, तसेच रस्त्याची रुंदी नमूद करावी.
आठ फुटांपेक्षा कमी रुंदी असलेल्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही.
आवश्यक ते शुल्क भरणा केल्यानंतर परवानगी देण्यात येईल.
गणेश उत्सव
२०१५

अध्यक्षपदी डाॅ. रश्मी बोरीकर
यावेळी निवडण्यात आलेली नूतन कार्यकारिणी अशी अध्यक्ष:डाॅ.रश्मी बोरीकर, कार्याध्यक्ष:अभयनिकाळजे, प्रधान सचिव:अतुलबडवे आणि व्ही. सी. भोयागळे (कन्नड), वैज्ञानिकजाणिवा प्रकल्प कार्यवाह: प्रा.डाॅ. अजित खोजरे, लक्ष्मण महाजन, बुवाबाजीसंघर्ष कार्यवाह: प्रा.डाॅ. शिवाजी वाठोरे (सिल्लोड), बुद्धप्रिय कबीर, विविधउपक्रम कार्यवाह: विलासम्हस्के (वैजापूर) आणि शिवराज पाटील, महिलाविभाग कार्यवाह: अॅड.अंजली कापसे आणि शीतल राजपूत (वैजापूर), युवाविभाग कार्यवाह: प्रशांतकांबळे, निधीसंकलन कार्यवाह: मोहनभोमे, सांस्कृतिकविभाग कार्यवाह: गीताकोल्हटकर.