आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Off Of Aurangabadite Researcher : Save Water With Electricity Through Water Level Indicator

औरंगाबादकर संशोधकाची भरारी: वॉटर लेव्हल इंडिकेटरद्वारे पाण्यासह विजेचीही बचत शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाणी व विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील विद्युत अभियंता प्रताप बोरवंडीकर यांनी नवे यंत्र शोधून बचतीचा पर्याय सुचवला आहे. वॉटर लेव्हल इंडिकेटरच्या माध्यमातून महिन्याला 40 युनिट वीज व सहा हजार लिटर पाण्याची बचत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाण्याची टाकी भरल्याचे निदर्शनास येण्याच्या उपाययोजना केल्या होत्या, परंतु विजेची बचत होत नव्हती. बोरवंडीकरांच्या प्रयोगातून दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत.

खोकडपुर्‍यातील बोरवंडीकर यांचे विद्युत शाखेत बी. ई. झालेले आहे. व्हिडिओकॉन कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना त्यांनी वीज व पाणी बचतीची शक्कल लढवली.


यंत्राचे तंत्र काय : बोरवंडीकर यांनी रेडिओच्या आकाराचे 30 बाय 15 सें.मी.चे यंत्र तयार केले. दोन हजार लिटर क्षमतेच्या सिंटेक्सच्या टाकीला विजेची जोडणी देऊन या यंत्राला सेन्सर बसवले. टाकी भरल्यानंतर पाणी यंत्राला लागताच जोराने बझर वाजतो. त्याच्या आवाजाने घरातील व्यक्ती त्वरित पाण्याची मोटार बंद करतात.


यंत्रामुळे अपव्यय टळला : प्रतिदिन साधारण एक ते दीड युनिट वीज अकारण खर्च होत होती. योग्य वेळी पाणी बंद न केल्यामुळे 10 बादल्या म्हणजेच 200 लिटर पाणी वाया जात होते. महिन्याला 40 युनिट वीज व सहा हजार लिटर पाण्याची बचत करणे शक्य झाले.