आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीट पकडेल त्याचीच जागा, बसमधील आरक्षण नावालाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिला, अपंग, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरक्षण आहे. खिडकीजवळ किंवा सीटच्या पाठीमागे सीट राखीव असल्याचे लिहिले जाते; पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जो पहिल्यांदा सीट पकडेल तोच तेथे बसून प्रवास करतो. यामुळे महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनींना उभे राहून किंवा चालकाच्या केबिनमध्ये बसून प्रवास करावा लागत आहे.
महामंडळाच्या वतीने पंधरा वर्षांपूर्वीच महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग, स्वातंत्र्यसैनिक, आमदार, खासदार आणि मुलींकरिता बसमध्ये बसण्यासाठी विशेष आरक्षण दिले आहे. हे आरक्षण फक्त साध्या बसेससाठी लागू आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक महिन्यापूर्वी व्होल्व्हो बसमध्येही महिलांसाठी विशेष आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाचा लाभार्थींना खरोखरच फायदा होतो का? याविषयी "दिव्य मराठी'ने जाणून घेतले असता, महिला ज्येष्ठ नागरिक अक्षरश: बस चालकाच्या बाजूला बसून प्रवास करत असल्याचे दिसून आले. मुलीही उभ्या राहूनच प्रवास करतात. आरक्षित जागेवर तरुण, जोडपे बसलेले होते. वाद नको म्हणून आरक्षणाचे हक्कदार काहीच बोलत नाहीत. वाहक अशा प्रवाशांना त्या जागेवरून उठवत नाहीत. त्यामुळे आरक्षण केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते.

विद्यार्थिनींची हेळसांड
विद्यार्थिनींसाठीते १० १५ आणि १६ क्रमांकाची सीट राखीव आहे. सर्वसाधारण मार्गावरील बसमध्ये हे आरक्षण असल्याचे महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी एप्रिल २०१५ मध्ये लिखित आदेश सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. तसेच परिवहन मंत्री रावते यांनी औरंगाबादेत आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये मुलींना जागा उपलब्ध करून द्या, त्यांना प्रवासात धक्काबुकी होता कामा नये, असे आदेश दिले आहे. या आदेशाची सर्रास पायमल्ली होत आहे. बहुतांश मुलींना बसायला जागा नसते. त्यामुळे त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो.
जागेअभावी अनेकदा महिला, ज्येष्ठ नागरिकांना चालकाच्या केबीनमध्ये बसून प्रवास करावा लागतो. छाया: अरुण तळेकर

असे असते बसमधील आरक्षण
वर्गसाधी बस एशियाड बस शिवनेरी
महिला०५ ०५ १०
ज्येष्ठ नागरिक ०५ नाही नाही
अपंग ०४
स्वातंत्र्यसैनिक ०२
आमदार ०१
खासदार ०१
विद्यार्थिनींकरिता ०६

आरक्षणाचे पालन व्हावे
महिलांनाबसमध्ये बसण्यासाठी राखीव जागा आहे; पण तेथे बसण्यासाठी भांडण करावे लागते. त्यापेक्षा जागा मिळेल तेथे बसून प्रवास करतो. दिल्ली, मुंबई, पुणे शहरात आरक्षणाचे तंतोतंत पालन होते. त्याच धर्तीवर औरंगाबाद ग्रामीण भागात व्हावे. मंदाबाईऔटे, प्रवासी महिला.

ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठनागरिकांना आरक्षणाविषयी विचारले असता, फक्त जणांना माहिती होती, तर जणांनी बसमधील रेटारेटीविषयी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठांच्या सीटवर तरुण बसतात. त्यांना उठा म्हटले तर राग येतो. अनादर झाल्यापेक्षा जागा मिळेल तेथे आम्ही बसतो.

वाहक
१७वाहकांना आरक्षणाबद्दल विचारले असता त्यापैकी ११ जणांनी माहिती असल्याचे सांगितले. सीटवरून बसमध्ये वादावादी होत असल्याचे सांगितले. प्रवाशांनी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उर्वरित जणांनी आरक्षणाची माहिती नसल्याचे सांगितले.

महिला
२२पैकी १३ महिलांनी बसमधील आरक्षित सीटची माहिती असल्याचे सांगितले. महिलांनी माहिती नाही, असे उत्तर दिले. पण ज्या १३ जणींना आरक्षण माहिती होती त्यांना किती कोणती सीट राखीव आहे, याची माहिती नव्हती. दुसरे म्हणजे पतीसोबत प्रवास करत असल्यास एकाच सीटवर दोघे बसतात. तेव्हा ती सीट आरक्षित आहे का, हे पाहिले जात नाही.
महिलांनाया आरक्षित अासनाचा लाभ घ्यावा
साधीबस : १३,१४, २०, २७, २८ सीट क्रमांक महिलांसाठी राखीव आहेत.
सेमीएशियाड : ५,६, ११ ,१२, १३
शिवनेरी: ते१२ क्रमांकाच्या दहा सीट महिलांसाठी राखीव असतात. तसे आदेश परिवहन मंत्री रावते यांनी २८ ऑगस्ट २०१५ रोजी काढले आहेत.

प्रवासी जागृत झाल्याशिवाय पर्याय नाही
बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक आदींसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत. अट फक्त एवढीच असते की, त्यांनी जेथून बस निघते तेथून बसणे आवश्यक आहे. स्वत: आरक्षण सीट तब्यात घेतली पाहिजे. त्या ठिकाणी कोणी बसला तर वाहकाची मदत घ्यावी. आरक्षित जागेविषयी प्रवासी जागृत झाल्याशिवाय पर्याय नाही. रा.ना. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद विभाग.

पाहणीतील निष्कर्ष असे
खासदार,आमदार अपवादात्मक या आरक्षणाचा लाभ घेतात. माजी आमदार शालिग्राम बसैये यांच्यानंतर कुणी बसमध्ये प्रवास केल्याची नोंद नाही. त्याला आज १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याचा विचार केला तर बसमधील आमदार, खासदारांचे एका सीटचे आरक्षण बिनकामाचे असल्याचे स्पष्ट होते.
सिडको बसस्थानक उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू
कामाची सुरुवात : १३फेब्रुवारी २०१४
डेडलाइन: फेब्रुवारी२०१६
आतापर्यंतझालेले काम : ६२%
लांबी: किलोमीटर
रुंदी: १४मीटर

कशामुळे विलंब ?
पश्चिमेच्याबाजूने पुलाचे लँडिंग नेमके कुठे करायचे, यावरून मतभेद. निधीचे वितरणही थांबले होते.

कामाचीकिंमत : ५५.२५कोटी
गेल्या तीन महिन्यांपासून नियोजनानुसार काम सुरू. आता वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता.
सिडको बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम ६२ टक्के पूर्ण झाले आहे. शुक्रवारी एपीआय कॉर्नर भागात पुलावर गर्डर टाकण्यात आले. यामुळे सकाळपासून वाहतुकीची कोंडी होत होती.