आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध नळ कनेक्शन घेतानाच कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकीकडे समांतरच्या कंपनीकडे पाणीपुरवठा दिल्यानंतर पाणी मिळत नाही अशी ओरड सुरू असताना चक्क ३५० मिमीच्या मुख्य जलवाहिनीतून ५० अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचे काम सुरू असतानाच हाणून पाडण्यात आले.
विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या पायलटबाबा नगरीच्या समोरून ३५० मिमीची मुख्य जलवाहिनी जाते. या परिसरातील नागरिकांनी चक्क ही पाइपलाइन खोदून अनधिकृत नळजोडणी घेण्याची तयारी केली होती. त्यानुसार प्लंबर आपल्या कारागिरांसह दाखल झालेही होते. तसेच पाइपही येऊन पडले होते. पण औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीच्या दक्षता पथकाला याची कुणकुण लागल्यानंतर त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने हे काम थांबवले. पथक आल्याचे पाहताच प्लंबरनेही तत्काळ पळ काढला. पाइप इतर मुद्देमालाचा जागेवर पंचनामा करण्यात आला असून यासंदर्भात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, आपल्या अासपास कोणी अनधिकृत नळ घेत असल्यास २४०-६६५५००० या क्रमांकावर माहिती कळवावी.
सिटी वॉटर युटिलिटीची वसुली घटली
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, मनपाने दिलेली अवैध नळ कनेक्शनची संख्या प्रत्यक्षातील संख्या यात मोठी तफावत आहे. मध्यंतरी बाबा पेट्रोल पंपाजवळील म्हाडा कॉलनीत ३५ हून अधिक नळ कनेक्शन अवैधरीत्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आल्याचे उघड झाले होते. या अवैध नळ कनेक्शनमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून याविरोधात लवकरच धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे.