आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलाठ्यांची हजेरी अ‍ॅपवर, "सेल्फी'ने द्यावा लागणार पुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तलाठीनियुक्तीच्या गावी जाता तालुक्याच्या ठिकाणाहूनच आपला कारभार हाकतात, अशी ओरड यापुढे होण्याची शक्यता कमी आहे. कारण सप्टेंबरपासून तलाठ्यांना ड्यूटीच्या गावातून सेल्फी (मोबाइलमधील स्वत:चे छायाचित्र) काढून ती उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून हजेरी लावावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना तलाठी हजेरी अॅप देण्यात आले असून, मंगळवारी १९ तलाठ्यांनी अशी हजेरी नोंदवली.

तलाठ्यांनी अँड्रॉइड मोबाइल घेणे बंधनकारक आहे. ३८९ तलाठ्यांपैकी पहिल्या दिवशी २५, तर दुसऱ्या दिवशी १९ तलाठ्यांनी अशी हजेरी लावली. पुढील महिन्यात सेल्फीद्वारे हजेरी नसेल तर पगार होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

रेंज नसताही अ‍ॅप सक्रिय, वरिष्ठांना माहिती देणार
- नियुक्तीच्या गावात जाऊन स्वत:चा फोटो काढून अ‍ॅपवर टाकला की हजेरी लागेल.
- फोटो कोठे काढला याची नोंद अ‍ॅपवर होते. मोबाइल रेंज नसताना सॉफ्टवेअर काम करते.
- नेटवर्क नसलेल्या गावात काढलेला फोटो नेटवर्कमध्ये येईल वरिष्ठांकडे गेल्यानंतर तो कोठे काढला याची अचूक माहिती देईल.

- म्हणजे नियुक्तीच्या चार-पाच गावांपैकी तलाठी त्या दिवशी नेमके कोणत्या गावात होते हे वरिष्ठांना कार्यालयात बसल्याजागी आयपॉडच्या माध्यमातून कळू शकेल.
काय आहे यंत्रणा
सप्टेंबरपासून नियम लागू
मोबाइलद्वारे साॅफ्टवेअरवर टाकणे सक्तीचे
मंगळवारी १९ जणांची हजेरी
ग्रामसेवकांनाही होणार अनिवार्य
शनिवारी कार्यशाळा

यंत्रणा अद्ययावत करणार
तलाठ्यांची हजेरी नव्या पद्धतीने सुरू झाल्यानंतर ग्रामसेवक, कृषी सहायकांनाही अशीच हजेरी लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.
तलाठ्यांची सेल्फी हजेरी यापुढे अनिवार्य असणार हे नक्की आहे. संघटनेचीच ही मागणी होती. याबाबत काही तलाठ्यांना अडचणी आहेत. चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी शनिवारी, रोजी तापडिया नाट्यमंदिरात एकदिवसीय कार्यशाळा ठेवली आहे. या नव्या उपस्थिती प्रणालीला कोणीही विरोध करू नये, असे आवाहन राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष सतीश तुपे यांनी केले.
सर्व यंत्रणा अद्ययावत करण्याचा प्रयत्न आहे. जनतेच्या सोयीसाठी हे प्रयत्न आहेत. यामुळे कामे त्वरेने होतील.
-विक्रमकुमार,जिल्हाधिकारी