आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा निवड समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दहा हजार उमेदवारांपैकी 109 उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. खुल्या प्रवर्गातून अजित गावंडे, ओबीसीमधून अमोल पगार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनुसूचितजाती प्रवर्गातून सुनील वाघमारे तर जमातीतून अविनाश गावित यांनी प्राविण्य मिळवले. खुल्या प्रवर्गात 54 जण उत्तीर्ण झाले आहेत.

ओबीसी 34, अनुसूचित जाती 11, अनुसूचित जमातीचे 10 जण उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वांची तोंडी मुलाखत मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.