आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांचनवाडी तलाठी कार्यालय तब्बल महिन्यांपासून बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर हद्दीतील कांचनवाडी तलाठी कार्यालयाला गेल्या सहा महिन्यांपासून कुलूप लागले आहे. रोज होणारी गर्दी, शाब्दिक चकमक, भांडणे आणि पार्किंगचा प्रश्न तसेच नेहमी धडकणारे मोर्चे आंदोलन यामुळे जागा मालकाने जागा रिकामी करून घेतली. त्यामुळे सहा महिन्यांपासून कार्यालय भरतच नाही. परिणामी, परिसरातील हजारो ग्रामस्थांची महत्त्वाची कामे अडली आहेत. कांचनवाडी सजा बंद झाल्याने ग्रामस्थांना कारण नसताना ‘सजा’ होत आहे. याबाबत महसूल विभागाला विचारले असता पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तहसील कार्यालयांंतर्गत महसूल विभागाने कांचनवाडी, गोलवाडी, नक्षत्रवाडी आणि तिसगाव या चार महसुली खेड्यांतील ४० हजार खातेदारांसाठी कांचनवाडीत गट क्रमांक ४२ मधील धिल्लन रेसिडेन्सीमध्ये पाच वर्षांपासून हे तलाठी कार्यालय थाटण्यात आले होते. ग्रामस्थांची कामे तातडीने व्हावीत, त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा हा यामागील हेतू होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयाला कायमचे कुलुप लागल्याने डीबी स्टारकडे असंख्य तक्रारी आल्या. चमूने पाहणी करून शहानिशा केली.

ग्रामस्थांची कामे अडली : सातबाराफेरफार, चतु:सीमांच्या नकला मिळवणे, दाखल्यातील चूक दुरुस्त करणे, पंचनामे तयार करण्यासाठी, जमीन-घर-फ्लॅट सातबाऱ्यात नाव नोंदवणे इत्यादी महत्त्वाची कामे अडली आहेत.

तलाठ्यांचे एकमेकांकडे बोट
याबाबत कांचनवाडीचे तलाठी अनिल कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याचे म्हणत तलाठी संजय पवार यांच्याकडे बोट दाखवले. मात्र, पवार यांनी कुलकर्णी यांच्याकडेच कांचनवाडी कार्यालयाचा पदभार असल्याचे सांगितले.

रहिवाशांचा तगादा
हेतलाठी कार्यालय कांचनवाडीतील रहिवासी भागात असल्याने अनेक समस्या येत होत्या. रोज येथे विविध कामांसाठी ग्रामस्थांची गर्दी व्हायची. शाब्दिक चकमकी उडायच्या. तर अनेक वेळा कार्यालयावर मोर्चे यायचे. त्यामुळे आसपासचे रहिवासी त्रस्त झाले होते. त्यांनी जागा मालकावर कार्यालयाची जागा रिकामी करून घेण्याबाबत तगादा लावला होता.
विद्यार्थीही हैराण
तलाठी कार्यालयात मोठ्यांबरोबरच जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी दाखले या आणि अशा अनेक दैनंदिन छोट्या-मोठ्या कामांसाठी विद्यार्थ्यांना यावे लागते, पण कार्यालय हलल्यामुळे त्यांनाही अनेक अडचणी येत आहेत.
काय म्हणतात तक्रारदार?
खातेदारांना कुठलीही पूर्वसूचना देता कार्यालय सहा महिन्यांपासून बंद करण्यात आले. खासगी दुकान स्थलांतरित झाले तर दुकानदार ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुन्या जागेत स्थलांतराचा पत्ता सांगणारा फलक लावतो; पण शासनाने याची दखल घेतली नाही. रघुवीरपाटील, ग्रामस्थ

तहसीलकार्यालयातगेल्यावर तलाठी, मंडळ अधिकारी गावात पंचनामे करायला गेले, फिल्डवर गेले, अशी उत्तरे देत तेथील कर्मचारी बोळवण करतात. यामुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होताे. रामभाऊ केदारे पाटील

सहामहिन्यांपासून कार्यालय बंद आहे. हे आम्हाला मान्य आहे. कार्यालयात महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने कार्यालय बंद झाल्यावर ते तहसील विभागात हलवले. जागेचा शोध घेणे सुरू आहे. तेथे कार्यालय सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन दिवसांच्या आत कार्यालय कांचनवाडी येथे पूर्ववत सुरू होईल. रमेशमुनलोड, अप्परतहसीलदार
तलाठ्यांचेमुख्यालयहे त्यांचे सजाचे ठिकाण असते. आणि ते तेथेच असणे आवश्यक असते. चार ते पाच गावे जोडलेली असतात. तलाठी सजा मुख्यालयीच असणे अभिप्रेत आहे. याबाबत महाराष्ट्र तलाठी महासंघाच्या वतीने तातडीने पाठपुरावा करून कांचनवाडीत तलाठी सजा कार्यालय सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करतो. सतीश तुपे, सरचिटणीस,राज्य तलाठी महासंघ
बातम्या आणखी आहेत...