आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठ्यांचा संप मागे, रिक्त पदे भरणार; खडसेंची मध्यस्ती कामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील तलाठ्यांनी संप आणि त्यांचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा तलाठी महासंघाच्या वतीने शुक्रवारी रात्री करण्यात आली. तलाठी महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे, सरचिटणीस समिती तुपे यांनी गुरुवारी येथील सुभेदारी विश्रामगृह येथे खडसे यांची भेट घेवून तलाठयांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणाची करण्यात आली.

तलाठ्यांच्या मागण्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करुन घेतल्या जातील, असे आश्वासन खडसे यांनी दिले. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन आणि संप त्वरीत मागे घेत आहोत, अशी घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. तलाठ्यांच्या मुख्य मागण्यांना मान्यता मिळविण्यासाठी व इतर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल तलाठी महासंघातर्फे खडसे यांचे आभार मानण्यात आले. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील १२,३२७ तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यात येईल. तसेच तलाठ्यांची रिक्त, वाढीव पदे भरण्यासंदर्भात ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासनही सरकारने दिल्याचे
पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई येथे झालेल्या गुरुवारच्या बैठकीत तलाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.
या बैठकीत सात-बारा उतारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याबाबत येणाऱ्या अडचणी, ब्रॉडबॅण्ड सुविधा, तलाठ्यांना एन.आय.सी. चे प्रशिक्षण, तलाठ्यांसाठी कार्यालयीन इमारत, तसेच काम करण्यासाठी लॅपटॉप आणि प्रिंटर पुरविणे, इत्यादी विषयावर तपशीलवार चर्चा झाली. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन खडसे यांनी दिले होते. त्यामुळे हा संप मागे घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...