आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीहून वेरुळला येणाऱ्या कारला टँकरची धडक, 3 पर्यटकांसह चालक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ - सोलापुर धुळे महामार्गावरील वेरुळ बायपासवर टँकर आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात 3 पर्यटकांसह पर्यटकासह कार चालक जखमी असे एकूण 4 जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला आहे. 
 
विशाखापट्टनम (विजयनगर) येथील रहिवासी किरण कुमार कुटुरंगराव लाडे (39), पतनुरू रवीकुमार वासुदेवराव (35), पी संतोषकुमारी (32), पिदेवेशु (6), पिबेदोशु (4) आणि एलकिर्थन (9) हे सगळेच शिर्डीत दर्शन घेवून वेरुळला निघाले होते. कार क्रमांक एम एच 17 बीडी 3368 ही भाडयाने घेवून वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव दर्शन व जगप्रसिद्ध लेनी पहाण्यास येत असताना वेरुळ बायपासवर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात पेट्रोल टैंकर एम एच 20 सीटी 8887 ने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कार चालक पद्मनाथ दत्तात्रय लोखंडे (44) रा. पोहेगाव (कोपरगांव) यांच्यासह तीन पर्यटक जखमी झाले. या जखमींना पोलिस पाटिल रमेश ढिवरे, गोपालकृष्ण गारिकीपाटी यांनी मदत करत डॉ. सारंग पाटणी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खुलताबाद पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या नेतृत्वात बिट जमादार प्रल्हाद तांबे व श्रीकांत चेळेकर हे पुढील तपास करत आहेत.  सुदैवाने, या दूर्घटनेत लहान बालकांना कोणतीही ईजा झाली नाही. 
बातम्या आणखी आहेत...