आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात तयार होतील आता रणगाड्यांचे सुटे भाग, 'डिफेन्स एक्स्पो'त 'मेक इन मराठवाडा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहरात लवकरच डिफेन्स क्लस्टर तयार होण्याचे संकेत आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानाने जगातील अव्वल दर्जाचे रणगाडेच नव्हे तर सर्वच संरक्षणविषयक साहित्य आम्ही तयार करू शकतो, हा संदेश औरंगाबादेतील आठ उद्योजकांनी दिला. शहरातील आठ उद्योजकांनी 'मेक इन मराठवाडा'ची जादू जागतिक पातळीवर दाखवली.
शहरात सध्या साडेतीन हजारपेक्षा जास्त कारखाने आहेत. जगातील तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी स्वत:ला अपडेट करीत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. शहरात आठ ते दहा इंजिनिअरिंग उत्पादने करणाऱ्या कंपन्यांत रोबोट तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे, तर काही उद्योजक हे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. आपल्या उद्योजकांची दखल जपान, जर्मनीसह अमेरिका युरोपीय देशांनी घेतली आहे.

पुढे वाचा.. संरक्षण विभागाच्या उत्पादनांसाठी रोबोट