आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदचा कट: औरंगाबादचे पाेलिस मुख्यालय होते टार्गेट, जप्त गाडीचा मालक फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून परभणी येथून अटक करण्यात आलेल्या शाहिद शेखने एका साथीदाराला सोबत घेऊन दीड महिन्यापूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयाची रेकी केली होती. रमजानमध्ये या कार्यालयांत तसेच शहरात घातपात करण्याचा कट त्याने रचला होता. मात्र, पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणांची निगराणी वाढल्यामुळे त्याला ते शक्य झाले नाही, असे तपासात पुढे आल्याची माहिती पोलिस दलातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

एटीएसचे उच्चस्तरीय पथक सध्या शाहिद शेखची कसून चौकशी करत आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, शाहिदने औरंगाबादेतील काही ईदगाह मैदानांची रेकी केली होती. त्याने पोलिस अधीक्षक कार्यालय उडवण्याचे टार्गेट निश्चत केले होते. कारमध्ये बॉम्ब ठेवून धमाका करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्याने आणखी काही जणांना सोबत घेऊन बरीच जमवाजमव केली होती. मात्र, त्याचा तपशील उघड करण्यास सूत्रांनी नकार दिला. परंतु त्याच्याकडून मिळणारी माहिती लक्षात घेता स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्यासाठी अतिरेकी प्रयत्न करत आहेत, असे लक्षात आले असून कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी एटीएस, पोलिस यंत्रणा जोरात कामाला लागली अाहे. वेरुळ घातक शस्त्रसाठा प्रकरणी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु जिंदालला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा बदला घेण्यासाठी काही कट रचण्यात आला आहे का, याचाही तपास सुरू आहे.
शादेहला दुचाकी विकणारा फरार
११ जुलै रोजी परभणी येथून नासेर चाऊसला इसिसच्या संपर्कात असल्याचा कारणावरुन एटीएस पथकाने अटक केली होती. त्या पाठोपाठ शाहिदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आयडी बॉम्ब जप्त करण्यात आला होता. शाहिदच्या निशाण्यावर काय होते. त्याने घातपाताचा कोणता कट रचला होता, याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात औरंगाबादेत राहणारा एक तरुण एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे आला. शाहिद हा माझ्या परिचयाचा होता. माझ्या घरी त्याची काळ्या रंगाची पल्सर गाडी ठेवून तो परभणीला गेल्याचे त्याने अधिकाऱ्याला सांगितले. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत ती दुचाकी ताब्यात घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी केली असता सुदैवाने त्यात कोणतेही स्फोटक सापडले नाही. मग पोलिसांनी दुचाकी शाहिदकडे नेमकी कुठून आली, या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा ती त्याने जालन्यातून बजाज फायनान्समध्ये काम करणाऱ्या इम्रान खान (नाव बदलले आहे.) कडून खरेदी केली होती, असे निदर्शनास आले. एटीएसने इम्रानचा शोध सुरू केला असता तो फरार असल्याचे समोर आले.
पोलिस अधीक्षक कार्यालय का?
२०१२ मध्ये रोजाबाग येथे एटीएससोबत झालेल्या चकमकीत अजहर कुरेशी ऊर्फ खलील (रा. खंडवा) मारला गेला. अबरार ऊर्फ इस्माईल ऊर्फ मुन्नासह दोन जणांना अटक करण्यात आली होती. २०१२ मध्ये वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालला पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसने भूमिका बजावली. त्या वेळी एटीएसप्रमुख असलेले नवीनचंद्र रेड्डी सध्या पोलिस अधीक्षक आहेत. त्यामुळे तेव्हापासून ते अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर हाेते, असे सूत्रांनी सांगितले.
नवीनचंद्र रेड्डींवर होती नजर : सध्याचे पोलिस अधीक्षक आणि तत्कालीन एटीएसप्रमुख नवीनचंद्र रेड्डी यांच्या हालचालींवर शाहिद नजर ठेवून होता. रोजाबाग एन्काउंटरचा बदला त्याला घ्यायचा होता. तेव्हा जप्त करण्यात आलेले आयईडी, रसायने त्याने हैदराबाद, नांदेड, पुणे येथून मिळवले होते. औरंगाबाद एटीएसने हा सारा अहवाल मुंबई येथे पाठवला असून रेड्डी यांना अधिक सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
इसिसच्या सायन्स विंगशी होता संपर्क
शाहिदपूर्वी परभणीतून नासेर बिन चाऊसला एटीएसने पकडले हाेते. इसिसच्या सायन्स विंगशी तो संपर्कात होता. फारुक नावाच्या व्यक्तीने शाहिद, नासेरची सायन्स विंगच्या कमांडरची ओळख करून दिली होती. आयईडी बॉम्बचे प्रशिक्षण त्याला सोशल नेटवर्किंगवर दिले होते. त्यामुळे या कटातील इतर संशयितांचा शोध आता सुरू झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...