आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Target Of The Save Food Committee On The Hotel, Tavern

अन्न वाचवा समितीचे पुढील लक्ष्य हॉटेल, खानावळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: विवाह किंवा अन्य सोहळ्यात वाया जाणारे अन्न गोरगरिबांना मिळावे, यासाठी अन्न वाचवा समितीने हाती घेतलेल्या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोहळ्यांचे आयोजन करणारी मंडळी समितीला पूर्वकल्पना देऊन उरलेले अन्न त्यांच्या ताब्यात देत आहे. लग्नसराईचा मोसम संपताच समिती हॉटेल, खानावळींतून अन्न गोळा करणार आहे.
या समितीत हिंदू-मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी समिती स्थापन केली. शहराच्या विविध भागांतून गोळा केले जाणारे अन्न घाटी परिसरात नेेले जाते. तेथे पाणचक्की गेटजवळील जमिल बेग मशिदीत अन्नदान केले जाते. अन्न वितरणाचे काम ऑल इंडिया तामिर-ए- मिल्लततर्फे केले जाते. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष अनंत मोताळे यांनी सांिगतले की, सध्या शहरातील ७० मंगल कार्यालयांत विवाह सोहळे सुरू आहेत.
समितीकडून तेथे अन्नदान समितीची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मंगल कार्यालय संचालकांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. समितीत कलश मंगल कार्यालयाचे किशोर लव्हेकर, साखरे कार्यालयाचे साखरे, राजेश कुलकर्णी, जयराम टेकाळे, पुरुषोत्तम जोशी, सनवीर छाबडा, स्नेहा बक्षी आदींचा समावेश आहे. तामिर-ए-मिल्लतचे मोईन हशर म्हणाले की, विवाह मुहूर्ताच्या दिवशी ८०० ते १००० लोकांचे अन्न उपलब्ध होते. जूनअखेरीस लग्नाचा मोसम संपेल. त्याच काळात समिती शहरातील हॉटेल्स, खानावळी, मुला-मुलींच्या वसतिगृहातून अन्न गोळा करणार असल्याचे मोताळे म्हणाले.