आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची तत्काळ आरक्षण सेवा आता सकाळी 10 वाजेपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रेल्वेच्या तत्काळ आरक्षणात मंगळवारपासून बदल करण्यात आला आहे. सकाळी 8 ऐवजी आता 10 वाजेपासून आरक्षण करण्यात येईल. दरम्यान, गैरप्रकार टाळण्यासाठी आरक्षण खिडकीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केले असले तरी कॅमेरे न लावताच आरक्षण करण्यात येणार आहे.
तत्काळ आरक्षणाच्या वेळेत बदल झाल्यामुळे पहाटेपासून रांगा लावणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दलालांचा सुळसुळाटही यामुळे कमी होईल. वेळेत बदल करण्याच्या सूचना असल्या तरी सीसीटीव्ही, मोबाइल ज्ॉमर तसेच एकाच काऊंटरवरून तत्काळ आरक्षण यासंबंधी निर्देश प्राप्त झाले नसल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम यांनी दिली. सध्या रेल्वे आरक्षण केंद्रात 3 काऊंटर सुरू आहेत. तिन्ही खिडकीतून आरक्षण करता येणार आहे. सुमारे 4 महिन्यांपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा अद्यापही बसवण्यात आलेले नसल्याने दलांलावर नजर कशी ठेवली जाणार हा मोठा प्रश्न अद्यापही कायम आहे.