आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारी तवेरा पकडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - वेरूळ येथील हॉटेल न्यू कैलाससमोर उभ्या असलेल्या तवेरा कार (एमएच २० बीवाय २८२२) मध्ये देशी दारूचे बॅाक्स  असल्याची माहिती खुलताबाद पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीवरून खुलताबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारमध्ये असलेल्या दोन बाॅक्समध्ये देशी दारूच्या ९६ बाटल्या आढळल्या. याप्रकरणी कारचालक कृष्णा उत्तम खोसरे (३५) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास  बीट जमादार गणेश काथार, वाल्मीक चव्हाण, शेख रफिक, भावसिंग जारवाल, विष्णू चव्हाण, सय्यद यांनी केली.
 
बातम्या आणखी आहेत...