आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवसुलीचे उद्दिष्ट अशक्य, सुधारित अर्थसंकल्पाच्या हालचाली सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा प्रशासनाने आता सुधारित अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली असून त्यासाठी पुढील अर्थसंकल्पासाठी सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती मागवली आहे. चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे अडीच महिने बाकी असून १५४ कोटींचे करवसुलीचे टार्गेट डोक्यावर घेऊन निघालेल्या प्रशासनाला आतापर्यंत कसेबसे ५२ कोटीच वसूल करता आल्याने सुधारित अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने सुधारणा पाहायला मिळतील, असे चित्र आहे.

२०१५-१६च्या अर्थसंकल्पाचे त्रांगडे पार डिसेंबर महिन्यापर्यंत चालले. आधी निवडणुका, नंतर मुख्य अर्थसंकल्पाला उशीर त्यात स्थायी समिती सर्वसाधारण सभेकडून झालेला उशीर या सगळ्या विलंबात डिसेंबर उजाडला. वास्तविक, डिसेंबर महिन्यापर्यंत आर्थिक गाडीचा वेग पाहून सुधारित अर्थसंकल्प सादर केला जातो; पण आता कुठे त्याची तयारी सुरू झाली आहे. लेखा विभागाने सर्व विभागप्रमुखांना सुधारित अर्थसंकल्पासाठी आगामी २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी माहिती देण्याचे पत्र दिले आहे. हे सर्व विभाग आपल्या विभागांच्या कोणकोणत्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करावयाचा याचा तपशील सादर करतील. त्यानंतर यंदाचा सुधारित अर्थसंकल्प मांडला जाईल.