आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न वाढवण्यासाठी टीडीआर बँक बनवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डबघाईला आलेल्या मनपाने उत्पन्न वाढीसाठी तसेच टीडीआरचा घोटाळा थांबवून रस्त्यांच्या विकासासाठी मनपाकडून टीडीआर बँकच तयार करण्याचा प्रस्ताव मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. मनपाबरोबरच नागरिकांनाही लाभ मिळण्यासाठी हा प्रस्ताव मांडू, असे सूचक नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी ११ वाजता महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर टीडीआरचा विषय घोडेले यांनी ठेवला आहे. महापालिकेने अनेक रस्त्यांच्या बाजूच्या जागा संपादित करून त्याचा मोबदला दिला आहे. त्या जागांच्या टीडीआरसाठीची बँक तयार करावी. हे टीडीआर विकून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकता येईल, असे या प्रस्तावाचे स्वरूप आहे.

विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी महापालिकेकडून खासगी मालमत्ताधारकांना अार्थिक स्वरूपात किंवा टीडीआर स्वरूपात मोबदला दिला जातो. ज्या मालमत्ताधारकांना अार्थिक स्वरूपात मोबदला देऊन त्यांची जागा संपादित केली त्या जागांचे टीडीआर विकून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

असा आहे प्रस्ताव :आजपर्यंत महापालिकेने सार्वजनिक हितासाठी डीपी रस्त्यांचे, आरक्षित भूखंडांचे अार्थिक स्वरूपात मोबदला देऊन भूसंपादन केले आहे.

संपादित जागेची मालकी मनपाची असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा सर्व भूखंडांच्या क्षेत्रांचे मूल्यमापन करून महापालिकेची स्वतंत्र टीडीआर बँक सुरू करावी. या टीडीआर बँकेत अार्थिक स्वरूपात मोबदला देऊन भूसंपादन केलेल्या जागांचे टीडीआर जमा करून नंतर महापालिकेने निर्धारित केलेल्या दराने त्यांची विक्री करावी. त्याने महापालिकेच्या अार्थिक उत्पन्नात वाढ होईल.

यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. धोरण ठरवताना कायदेविषयक सल्ला, तज्ज्ञांची समिती तिचा अहवाल तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकेच्या टीडीआर धोरणाच्या नियमात बदल करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी असा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवला जाईल, असेही घोडेले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...