आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबदल्याचे बिंग फुटले, टळला टीडीआर घोटाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्ता रुंदीकरणासाठी मंजूरपुरा येथील जमीन १९९७ ला संपादित करण्यात आली. मालमत्ताधारकाला रोखीने मोबदलाही देण्यात आला. त्या मालमत्ताधारकांच्या वारसांनी चार महिन्यांपूर्वी त्याच मालमत्तेच्या संपादनाचा टीडीआर देण्यात यावा, अशी मागणी केली. पी. आर. कार्डवर मालमत्ताधारकाचेच नाव असल्याने पालिकेने पुढील प्रक्रिया सुरू केली. आक्षेप, हरकती मागवण्यात आल्यानंतर मोबदला घेण्यात आल्याचे समोर आले अन् टीडीआरचा एक घोटाळा होता होता राहिला. एमआयएम नगरसेवक विकास एडके यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. मंजूरपुरा येथील सिटी सर्व्हे क्रमांक ७६६१ आणि ७६६३ यातील काही जमीन रस्त्यासाठी संपादित करण्यात आली होती. त्यासाठी १९९७ मध्ये लाख ९३ हजार रुपये टीडीआर देण्यात आला होता, तरीही अब्दुल समीर यांच्यामार्फत पुन्हा टीडीआरची मागणी करण्यात आली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठरवून हा घोटाळा केल्याचा एडके यांचा आरोप होता. या मुद्द्यावर स्थायी समितीत पुढे चर्चा झाली नाही.
बातम्या आणखी आहेत...