आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार नसल्याने शिक्षकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - शिक्षकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुरुवारी संस्थाचालक सुभाष गंगाराम मानकर यांच्यावर अजिंठा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौदा वर्षांपासून पगार नसल्याने तणावाखाली असलेल्या पतीस ब्रेन हॅमरेज झाल्याचे पुंडलिक दांडगे यांच्या पत्नीने म्हटले आहे. पानवढोद (बुद्रुक) येथील स्वातंत्र्यसेनानी गंगारामजी मानकर विद्यालयात नोकरीस असलेले शिक्षक पुंडलिक दांडगे (रा. जळकीबाजार, ता. सिल्लोड) यांचा उपचारादरम्यान बुधवारी घाटीत मृत्यू झाला. गुरुवारी त्यांचे पार्थिव नातेवाइकांनी शाळेसमोर आणले. संस्थाचालकावर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

शिक्षणाधिका-यांकडे तक्रार
पुंडलिक दांडगे यांच्या पत्नी कल्पना यांनी संस्थाचालक पगार देत नसल्याने व नोकरीत कायम करण्यासाठी साडेतीन लाख रुपये घेऊनही नोकरीत कायम केले नाही, यामुळे मृत्यू झाला. मृत्यूस सुभाष मानकर जबाबदार असून कारवाईची मागणी शिक्षणाधिका-यांकडे केली आहे.